वयाच्या पंचवीशीत धर्म बदलला, 9 हजारांपेक्षाही जास्त धावा, उथप्पाचं करिअर जाणून घ्या 5 मुद्द्यांत

उथप्पा वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत हिंदूच राहिले पण 2011 मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

वयाच्या पंचवीशीत धर्म बदलला, 9 हजारांपेक्षाही जास्त धावा, उथप्पाचं करिअर जाणून घ्या 5 मुद्द्यांत
पाकिस्तानला धुळ चारणारा उथप्पा निवृत्तImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 9:11 PM

मुंबई : आज दिग्गज क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का दिला. मात्र, काही दिवसांपूर्वी टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर नाराजी वाढल्याच्याही बातम्या आल्या. यातच आता उथप्पाच्या निवृत्तीशी देखील त्याला जोडलं जातंय, अशा चर्चा देखील रंगल्या आहेत. दरम्यान, रॉबिन उथप्पाचं कारकिर्द विशेष राहिली. टीम इंडियासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने तो खेळला आहे. उथप्पा हा टीम इंडियाच्या पहिल्या T20 विश्वचषक विजयाचा नायक होता. उथप्पाने कर्नाटक आणि केरळसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले ज्यात त्याच्या बॅटने 9000 हून अधिक धावा केल्या. त्याने लिस्ट ए मध्ये 6534 धावा केल्या. टी-20 मध्येही त्याच्या बॅटने 7272 धावा केल्या होत्या. चला तर आता उथप्पाच्या आयुष्यातील पाच मोठ्या गोष्टींविषयी जाणून घ्या…

उथप्पाचं ट्विट

उथप्पाच्या कारकिर्दीतील 5 मोठ्या गोष्टी

  1. रॉबिन उथप्पाच्या वडिलांचं नाव वेणू उथप्पा असून ते आंतरराष्ट्रीय हॉकी रेफरी राहिले आहेत. ते कर्नाटक हॉकी संघटनेचे अध्यक्षही होते. वडिलांचे हॉकीवर प्रेम असूनही, उथप्पाने लहान वयातच क्रिकेटची निवड केली आणि खेळात स्वतःचे नाव कमावले.
  2. रॉबिन उथप्पाचे वडील हिंदू आणि आई ख्रिश्चन आहे. उथप्पा वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत हिंदूच राहिले पण 2011 मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. उथप्पासोबत त्याच्या बहिणीनंही ख्रिश्चन धर्म स्वीकारला.
  3. रॉबिन उथप्पा 10 वर्षांचा असताना त्याला झटके येत होते. उपचारांमुळे त्यांचा मेटाबॉलिक रेट वाढला होता. त्यामुळं त्याला वजन संतुलीत  राखण्यात खूप त्रास होत होता. त्याची समस्या 20-25 वर्षे टिकली पण त्यानंतर त्यानी आहारतज्ज्ञांच्या मदतीनं त्यावर मात केली. त्यानं 20 किलो वजन कमी करून स्वत:ला फिट बनवले.
  4. आपल्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेण्यासाठी, उथप्पानं माजी भारतीय फलंदाज प्रवीण अमरे यांना वैयक्तिक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. उथप्पा जिथे खेळायचा तिथे प्रवीण अमरे त्याच्यासोबत फिरायचा. अमरे यांच्यामुळेच उथप्पाने आपल्यातील अनेक उणीवा दूर केल्या आहेत.
  5. 2013-14 हे वर्ष उथप्पाच्या कारकिर्दीतील सुवर्ण वर्ष मानले जाते. यावर्षी त्याने कर्नाटकसाठी रणजी करंडक जिंकला. उथप्पाने यंदा विजय गमावला आणि इराणी ट्रॉफीही जिंकली. यासह त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल जिंकले.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.