कमिन्सचं कौतुक करताना वीरेंद्र सहवागने रोहितच्या चाहत्यांसह मुंबईकरांना डिवचलं… मग माफीदेखील मागितली
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकात्याने मुंबईवर एकहाती विजय मिळवला. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्सने (Pat Cummins) पॉवर हिटिंग शो दाखवला. कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत नाबाद 56 धावा फटकावल्या.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकात्याने मुंबईवर एकहाती विजय मिळवला. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्सने (Pat Cummins) पॉवर हिटिंग शो दाखवला. कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत नाबाद 56 धावा फटकावल्या. विस्फोटक आंद्रे रसेलला स्वस्तात बाद केल्यानंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सामन्यात पुनरागमन केलं होतं. पण पॅट कमिन्सने काही चेंडूत खेळच बदलून टाकला. त्याने आयपीएलमध्ये 14 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. आपल्या वादळी खेळीत त्याने चार चौकार आणि सहा षटकार लगावले. 13.1 षटकात रसेल बाद झाला. त्यानंतर पॅट कमिन्स मैदानात आला. त्याने 16 व्या षटकात सामनाच संपवून टाकला. पोलार्डने कमिन्सच्या शेवटच्या षटकात 23 धावा चोपल्या होत्या. त्याची भरपाई कमिन्सने बॅटने केली. 16 व्या षटकात कमिन्सने 35 धावा चोपल्या. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सहवागने (Virender Sehwag) कमिन्सचं तोंडभरून कौतुक केलं. परंतु ते करत असताना त्याने मुंबईकरांच्या आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
वीरेंद्र सहवाग त्याच्या हजरजबाबी स्वभावामुळे ओळखला जातो. सोशल मीडियावरही त्याची मतं लोकांचं लक्ष वेधून घेतात. पण, कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू पॅट कमिन्सचं कौतुक करताना त्याने मोठी चूक केली. मात्र सहवागने लगेचच त्याची चूक सुधारली. परंतु सहवाग सोशल मीडियावर जे काही बोलतो किंवा लिहितो ते त्याच्या चाहत्यांच्या नजरेतून कधीच सुटत नाही. पॅट कमिन्सच्या बाबतीत, एक गोष्ट घडली की, ज्यावर त्याला परत खुलासा करावा लागला.
कमिन्सचं वादळ
सहवागने नेमकं काय केलं होतं, हे जाणून घेण्याआधी कमिन्सची कामगिरी पाहा. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 162 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कमिन्सच्या एकट्याच्या बळावर केकेआरने हा सामना पाच विकेट आणि 24 चेंडू राखून जिंकला. त्याने एका ओव्हरमध्ये चार षटकार आणि दोन चौकार ठोकले.
14 षटकात कोलकात्याच्या पाच बाद 115 धावा झाल्या होत्या. पॅट कमिन्सच्या बॅटमधून तेव्हा एक चौकार आणि एक षटकार निघाला होता. बुमराहच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर कमिन्सने चौकार आणि षटकार ठोकला. आता KKR ला विजयासाठी पाच षटकात 35 धावा हव्या होत्या. क्रीझवर पॅट कमिन्स होता. डॅनियल सॅम्स 16 व षटक घेऊन आला. कमिन्सने या षटकात 35 धावा चोपून चार षटकं राखून सामना संपवला. या षटकात त्याने चार षटकार आणि दोन चौकारांसह आपलं अर्धशतकदेखील पूर्ण केलं.
सहवागचं ट्विट, चूक आणि खुलासा!
पॅट कमिन्सचा खेळ पाहून वीरेंद्र सहवागने एक ट्विट केलं, ज्यामध्ये त्याच्याकडून एक चूक झाली. त्यानंतर त्याने माफी मागत चूक सुधारली. त्याने आधी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं, “तोंडचा घास हिरावला, सॉरी वडापाव हिरावला…”
Moonh se nivala cheen liya ,, sorry vada pav cheen liya. Pat Cummins, one of the most insane display of clean hitting , 15 ball 56 … Jeera Batti #MIvKKR pic.twitter.com/Npi2TybgP9
— Virender Sehwag (@virendersehwag) April 6, 2022
सहवागच्या या ट्विटनंतर त्याला मुंबईकरांनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांनी ट्विटरवर चांगलंच सुनावलं. त्यानंतर सहवागने आपल्या जुन्या ट्विटवर कमेंट करत म्हटलं की, “वडापाव हा पदार्थ मी मुंबईचा संदर्भ म्हणून वापरला होता आणि रोहित शर्माच्या चाहत्यांनो थोडं थंड घ्या (शांत राहा), मीसुद्धा रोहितचा खूप मोठा चाहता आहे. तुमच्यापैकी बहुतेक जणांपेक्षा मी रोहितचा मोठा फॅन आहे.”
The Vada Pav reference is for Mumbai, a city which thrives on Vada Pav. Rohit fans thanda lo , I am a bigger fan of his batting much more than most of you guys.
— Virender Sehwag (@virendersehwag) April 6, 2022
इतर बातम्या
MI vs KKR kieron pollard: पोलार्ड तात्या अजूनही तितकाच डेंजरस, पाच बॉलमध्ये दाखवून दिलं
KKR vs MI Rohit Sharma: उमेश यादव समोर रोहित शर्मा हतबल, IPL मध्ये आतापर्यंत इतकावेळ घेतला विकेट