Rohit Sharma | “कोई भी…”, रोहित शर्माची सहकाऱ्यांनाच शिवीगाळ, व्हीडिओ व्हायरल

Rohit Sharma Viral Video | रोहित शर्माने आपल्या सहकाऱ्यांना इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान शिवीगाळ केल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rohit Sharma | कोई भी..., रोहित शर्माची सहकाऱ्यांनाच शिवीगाळ, व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 4:20 PM

विशाखापट्टणम | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर दुसऱ्याच दिवशी घट्ट पकड मिळवली आहे. यशस्वी जयस्वाल याच्या 209 धावांच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 396 धावा केल्या. इंग्लंडची 396 धावांच्या प्रत्युत्तरात घसरगुंडी झाली. टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या दोघांसमोर इंगलंडने शरणागती पत्कारली. झॅक क्रॉली याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला वरचढ होऊन दिलं नाही. या दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हीडिओत रोहित शर्मा आपल्या सहकाऱ्यांना उघडउघड शिव्या देत असल्याचं ऐकायला मिळत आहे. रोहित नेहमीच मैदानात काही न काही बोलत असतो, जे सामन्यादरम्यान क्रिकेट चाहत्यांच्या कानावर पडतं. रोहित नेहमीप्रमाणे आताही बोलला, मात्र त्याने शिव्या दिल्या होत्या. रोहितचा हा व्हीडिओ आता व्हायरल होतोय. रोहित सर्वांचाच लाडका आणि आवडता कॅप्टन आहे. मात्र त्याच्या या शिवीगाळ करतानाचा व्हीडिओ चाहत्यांना काही पटलेला नाही.

हे सुद्धा वाचा

नक्की काय झालं?

रोहितचा व्हायरल झालेला व्हीडिओ हा इंग्लंडच्या डावातील 31 व्या ओव्हरनंतरचा आहे. तेव्हा इंग्लंडने 4 विकेट्स गमावून 143 धावा केल्या होत्या. तर मैदानात जॉनी बेयरस्टो आणि कॅप्टन बेन स्टोक्स खेळत होते. या दरम्यानचा हा व्हीडिओ आहे. रोहितने सहकाऱ्यांवर मिस फिल्डिंगमुळे संतापून बोलल्याचं म्हटलं जात आहे. मात्र कारण काहीही असलं तरी रोहितने आपल्याच सहकाऱ्यांना शिवी देणं काही पटलेलं नाही.

तुम्हीच ऐका रोहित शर्मा काय म्हणाला?

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.