रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा शतकी धमाका, न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचे आव्हान
टीम इंडियाकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी धमाकेदार कामगिरी केली. दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला 380 पार मजल मारता आली.
इंदूर : टीम इंडियाने न्यूझीलंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 386 धावांचे आव्हान दिले आहे टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 385 धावा केल्या. टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा या सलामी जोडीने शतकी खेळी केली. शुबमनने सर्वाधिक 112 धावा केल्या. तर रोहितने 3 वर्षानंतर शतक ठोकलं. रोहितने 101 रन्सचं योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त हार्दिक पांड्याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर मधल्या फळीतील फलंदाजाना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्या खेळीचं रुपांतर हे मोठ्या आकड्यात करण्यात अपयश आलं.
विराट कोहली 36 धावा करुन माघारी परतला. इशान किशन 17 रन्सवर रन आऊट झाला. सूर्यकुमार यादवनेही पुन्हा निराशा केली. सूर्या 14 धावा करुन माघारी परतला. तर शार्दुल ठाकूर याने 25 धावांचं योगदान दिलं.
न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेयर टिकनर या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मिचेल ब्रेसवेलने 1 विकेट घेत या दोघांना उत्तम साथ दिली.
शुबमन, रोहित आणि हार्दिकची क्लासिक खेळी
Innings Break!
A mighty batting display from #TeamIndia! ? ?
1⃣1⃣2⃣ for @ShubmanGill 1⃣0⃣1⃣ for captain @ImRo45 5⃣4⃣ for vice-captain @hardikpandya7
Over to our bowlers now ? ?
Scorecard ▶️ https://t.co/ojTz5RqWZf#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/JW4MXWej4A
— BCCI (@BCCI) January 24, 2023
टीम इंडिया किवींना क्लीन स्वीप करणार?
टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने याआधी श्रीलंकेला एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप दिला होता. त्यानंतर आता पुन्हा टीम इंडियाकडे न्यूझीलंड क्लीन स्वीप करण्याची संधी आहे.
न्यूझीलंडला क्लीन स्वीप केल्यास टीम इंडिया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहचेल. तर न्यूझीलंडची थेट चौथ्या क्रमांकावर घसरण होईल.त्यामुळे आता तिसऱ्या सामन्याचा निकाल काय लागतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जॅकब डफी, ब्लेयर टकनर आणि लॉकी फर्ग्यूसन.