AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit sharma: स्वत:ला फिट ठेवणं, हेच रोहित शर्मा समोरचं मुख्य चॅलेंज, अजित आगरकरच स्पष्ट मत

कर्णधार म्हणून रोहितकडे आयपीएलचा (IPL) अनुभव आहे. आयपीएलध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपद पटकावलं आहे.

Rohit sharma: स्वत:ला फिट ठेवणं, हेच रोहित शर्मा समोरचं मुख्य चॅलेंज, अजित आगरकरच स्पष्ट मत
Rohit sharma-Ajit Agarkar BCCI Twitter
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 1:15 PM

मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यापासून (West indies Tour) कॅप्टन म्हणून रोहित शर्माच्या (Rohit sharma) नव्या इनिंगला सुरुवात होत आहे. येत्या 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. विराटच्या जागी आता रोहितकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून रोहितकडे आयपीएलचा (IPL) अनुभव आहे. आयपीएलध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपद पटकावलं आहे. आयपीएलमधला मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ आहे. आयपीएलप्रमाणेच टीम इंडियाचे नेतृत्व करताना रोहितने आयसीसीसह सर्वच महत्त्वाच्या स्पर्धांची जेतेपद मिळवून द्यावीत, अशी अपेक्षा आहे. सध्या भारतीय संघ खराब फॉर्ममधून जात आहे. टी-20 वर्ल्डकपपासून टीम इंडियाच्या कामगिरीला ग्रहण लागलं आहे. टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका सीरीजमध्ये कसोटी पाठोपाठ वनडे मालिकेतही भारताचा दारुण पराभव झाला. मधल्या फळीत ढेपाळणारी भारतीय फलंदाजी संघासमोर मुख्य अडचण आहे. या सगळ्यावर राहुल-रोहित जोडी कशी मात करते? ते लवकरच कळेल.

भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी, कर्णधार म्हणून रोहित शर्मासमोर मुख्य काय आव्हान असेल? त्यावर आपलं मत मांडलं आहे. बीसीसीआयने नोव्हेंबरमध्ये कर्णधार म्हणून विराटच्या जागी रोहितच्या नावाची घोषणा केली. पण दुखापतीमुळे रोहित शर्माला कसोटी मालिकेलाच नव्हे, तर वनडे सीरीजलाही मुकावं लागलं. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमधून वेळीच न सावरल्याने कसोटी पाठोपाठ वनडे मालिकेतही त्याला खेळता आलं नाही.

रोहितच्या आधी कर्णधारपद भूषवणारे एमएस धोनी आणि विराट कोहली….

रोहित शर्माला त्याच्या करीयरमध्ये अनेकदा फिटनेसच्या समस्येला सामोरं जाव लागलं आहे. स्टार स्पोर्ट्सवरील ‘गेम प्लान’ कार्यक्रमात अजित आगरकरने या मुद्यावर आपलं मत मांडलं. फिट रहाणं हे रोहित समोरचं मुख्य आव्हान आहे. रोहितच्या आधी कर्णधारपद भूषवणारे एमएस धोनी आणि विराट कोहली हे अपवादानेच दुखापतीमुळे काही सामन्याला मुकले असतील.

धोनी आणि विराटच ते बलस्थान होतं “मला वाटतं फिट राहणं हे रोहित समोरचं मुख्य आव्हान असेल. याआधी सुद्धा त्याला काहीवेळ दुखापत झाल्याचं आपण पाहिलं आहे. रोहितच्याआधी एमएस धोनी आणि विराट कोहली कर्णधार होते, ते पूर्णपणे फिट होते, तेच त्यांचं बलस्थान होतं. करीयरमध्ये फार कमीवेळा दुखापतीमुळे ते सामन्याला मुकले असतील” असं आगरकर म्हणाला.

Rohit Sharma biggest challenge will be to remain fit Ajit Agarkar

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.