Rohit Sharma सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, अफगाणिस्तान विरुद्ध फ्लॉप
Rohit Sharma Golden Duck | हिटमॅन रोहित शर्मा आपल्या 150 व्या ऐतिहासिक टी 20 सामन्यात काहीच करु शकला नाही. रोहित अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात पहिल्याच बॉलवर क्लिन बोल्ड झाला.

इंदूर | अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात 173 धावांचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची अफगाणिस्तान विरुद्ध पुन्हा एकदा वाईट सुरुवात झाली आहे. रोहित भोपळाही फोडण्यात यशस्वी होऊ शकला नाही. रोहित पहिल्याच बॉलवर आऊट झालाय. त्यामुळे तो गोल्डन डक ठरला आहे. तसेच रोहितची या मालिकत सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट होण्याची दुसरी वेळ ठरली आहे.
नक्की काय झालं?
यशस्वीने टीम इंडियाच्या डावातील पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून जोरात सुरुवात करुन दिली. त्यानंतर बॉलर फझलहक फारुकी याने दुसरा आणि तिसरा बॉल डॉट टाकला. यशस्वीने चौथ्या बॉलवर 1 धाव काढली. आता रोहित शर्मा स्ट्राईकवर आला. फझलहकने टाकलेला बॉल रोहितने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटला लागण्याऐवजी स्टंपला लागला आणि दांडी गुल झाली.
मालिकेत सलग दुसऱ्यांदा डक
रोहित शर्मा पहिल्या टी 20 सामन्यात दुसऱ्या बॉलवर झिरोवर आऊट झाला होता. रोहित फटका मारल्यानंतर एक धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवर धावत गेला. मात्र नॉन स्ट्राईक एंडला असलेला शुबमन गिल बॉल पाहता राहिला. गिल धावलाच नाही तसेच त्याने क्रीझही सोडली नव्हती. त्यामुळे रोहित आणि शुबमन दोघेही एकाच एंडवर येऊन पोहचले. त्यामुळे रोहित रन आऊट झाला. रोहित रन आऊट झाल्यानंतर शुबमन गिलवर चांगलाच संतापला होता.
रोहितची झिरोवर आऊट होण्याची कितवी वेळ?
दरम्यान रोहितची टी 20 क्रिकेटमध्ये झिरोवर आऊट होण्याची ही 12 वी वेळ ठरली आहे. रोहित टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारा भारतीय आहे. तसेच रोहितची ही कॅप्टन म्हणून झिरोवर आऊट होण्याची ही सहावी वेळ ठरली आहे.
रोहित असा झाला आऊट
This part of my life This little part Is called happiness
2 Match 2 Duck for Rohit Sharma pic.twitter.com/hs9eJudcXD
— Aarav (@sigma__male_) January 14, 2024
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.