Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: सेमीफायनलआधी टीम इंडियाच सर्वात मोठ टेन्शन दूर, एडिलेडमधून चांगली बातमी

IND vs ENG: नेट्समध्ये नेमकं काय घडलं?

IND vs ENG: सेमीफायनलआधी टीम इंडियाच सर्वात मोठ टेन्शन दूर, एडिलेडमधून चांगली बातमी
Team India
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 12:37 PM

एडिलेड: टीम इंडिया येत्या शुक्रवारी एडिलेड ओव्हलच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलचा हा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. या मॅचआधी आज टीम इंडियाच्या नेट्स सेशनमधून सर्वांना चिंतेत टाकणारी बातमी आली होती. पण सुदैवाने काही गंभीर नसल्याने थोड्याच वेळात सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

घडलं काय?

इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलआधी आज नेट्समध्ये सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली होती. पण सुदैवाने ही दुखापत फार गंभीर नाहीय. नेट्समध्ये रोहित आज स्पेशलिस्ट एस.रघुकून थ्रो डाऊनवर सराव करत होता. त्यावेळी एक चेंडू रोहितच्या उजव्या मनगटाच्या थोडा वर लागला. वेदनेने विव्हळत असलेल्या रोहितने तात्काळ बॅट खाली टाकली.

आईस-पॅक लावण्यात आला

टीमचे फिजियो कमलेश जैन यांनी दुखापतीची तपासणी केली. ते प्रॅक्टिस एरियाजवळच उभे होते. रोहितला खुर्चीवर बसवण्यात आलं. दुखापत झालेल्या भागावर आईस-पॅक लावण्यात आला. सपोर्ट स्टाफच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. बॅटिंग कोच विक्रम राठोर यांनी स्वत: दुखापतीची पाहणी केली.

रोहितने काठी वापरायला सांगितली

40 मिनिटानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा फलंदाजीसाठी नेट्समध्ये उतरला. दयानंद गारानी या दुसऱ्या थ्रो डाऊन स्पेशलिस्टसोबत रोहितने सराव सुरु केला. रोहित शर्मा काही चेंडू खेळला आणि त्याने काठी वापरण्यास सांगितलं. काठी म्हणजे बॉल थ्रो करणारं उपकरण आहे. पुन्हा फलंदाजी करताना रोहितला कुठलीही वेदना जाणवत नव्हती. हे पाहून सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.