Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
Rohit Sharma: रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधारपद स्वीकारल्यापासून भारतीय संघात एक नवीन ऊर्जा दिसतेय. टीम इंडियामध्ये जिंकण्याचा एक वेगळाच जोश दिसतोय. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) कमालीचं प्रदर्शन केलं आहे.
नवी दिल्ली: रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधारपद स्वीकारल्यापासून भारतीय संघात एक नवीन ऊर्जा दिसतेय. टीम इंडियामध्ये जिंकण्याचा एक वेगळाच जोश दिसतोय. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) कमालीचं प्रदर्शन केलं आहे. मागच्या दोन टी 20 मालिकांचा विचार केल्यास रोहित शर्माचं प्रदर्शन काही खास नाहीय. श्रीलंके विरुद्धच्या शेवटच्या दोन टी 20 सामन्यांमध्ये तर रोहित आल्यापावली पॅव्हेलियनमध्ये माघारी परतला. याकडे आता माजी विकेटकिपर साबा करीम (Saba Karim) यांनी लक्ष वेधलं आहे. कॅप्टनशिप ही अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यामुळे रोहितने त्याच्या फलंदाजीकडे लक्ष दिलं पाहिजे, असं साबा करीम यांनी म्हटलं आहे. “रोहित शर्मा आज फलंदाजीमुळे प्लेइंग इलेवनमध्ये आहे. कर्णधारपद एक अतिरिक्त जबाबदारी आहे. त्याने फलंदाजीवरुन लक्ष हटवू नये. अनेकदा आपण पाहिलय की, कर्णधार बनल्यानंतर क्रिकेटपटू त्याच्या प्राथमिक जबाबदारीमध्ये अपयशी ठरतो. हे असं होऊ नये” असं साबा करीम खेलनीतिशी बोलताना म्हणाले.
ऑस्ट्रेलियात रोहितला काही गोष्टी समजतील
साबा करीमने रोहित शर्माला फलंदाजीत अतिरिक्त मेहनत करण्याचा सल्ला दिला आहे. “रोहित शर्माचं कर्णधारपदाचा काळ सुरु झाला. बॅटने त्याचं योगदान किती महत्त्वाचं आहे हे लवकच त्याच्या लक्षात येईल. टी 20 वर्ल्डकपमध्ये बॅटने रोहितचं योगदान खूप महत्त्वाच ठरणार आहे. त्यामुळे त्याने त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे” असं साबा करीम यांनी सांगितलं. “ऑस्ट्रेलियात रोहितची कामगिरी किती महत्त्वाची आहे, हे हळू-हळू त्याच्या लक्षात येईल. ऑस्ट्रेलियातील मैदान मोठं आहे आणि प्रतिस्पर्धी संघाकडे उच्च दर्जाचे गोलंदाज आहे. रोहित शर्माला आपल्या फलंदाजीवर मेहनत घ्यावी लागेल” असं साबा करीम यांनी सांगितलं.
रोहित शर्माचा खराब फॉर्म
श्रीलंकेविरुद्ध टी 20 सीरीजमध्ये रोहित शर्माने तीन सामन्यात फक्त 50 धावा केल्या आहेत. 16.66 फक्त त्याची सरासरी आहे. संपूर्ण सीरीजमध्ये त्याने फक्त तीन चौकार आणि एक षटकार लगावला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्येही रोहितने तीन सामन्यात 26 च्या सरासरीने फक्त 78 धावाचं केल्या. म्हणूनच रोहितची बॅट तळपणं आवश्यक आहे.
rohit sharma needs to focus on his batting feels saba karim