IND vs SA 2nd Test | ‘तुम्ही भारतात या…’; रोहित शर्मा पिचवरून असं काही बोलला की सगळेच झाले गपगार
Rohit Sharma Conference : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेमध्ये पिचवरून मोठं वक्तव्य केलं आहे. पिचबाबत बोलताना रोहित असं काही बोललाय की सर्वांची तोंड बंद करून टाकली आहेत.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंडियाने सात विकेटने विजय मिळवला आहे. अवघ्या दीड दिवसात कसोटीचा निकाल लागला. हा सामना केपटाऊनमध्ये पार पडला, टीम इंडियाने सामना जिंकला असला तरीसुद्धा खेळपट्टीची जोरदार चर्चा होत आहे. कारण पहिल्या दिवशी या पिचवर तब्बल 23 विकेट पडल्या होत्या. सामना संपल्यावर कॅप्टन रोहित शर्मा पिचबाबत बोलताना असं काही बोलला आहे की जे टीम इंडियाच्या पिचवरून टीकास करतात त्यांची तोंड बंद केली आहेत.
काय म्हणाला रोहित शर्मा?
मॅचमध्ये काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. पिचवर खेळायला मला काही अडचण आली नाही. या पिचवर खेळणं आव्हानात्मक होतं. पिचवर क्रॅक असल्यामुळे खेळायला धोकादायक होतं. तुम्हीसुद्धा भारतामध्ये येऊन सामना करा. भारतात पहिल्या दिवशी ट्रॅक बदलला की पिचवरून धूळ उडत आहे असं बोललं जातं. वर्ल्ड कप फायनलमधील शतक मारलं गेलं तरीसुद्धा पिचवरून टीका करण्यात आली. तुम्ही पिच पाहून रेटिंग द्या देश पाहून नको, असं रोहित शर्मा म्हणाला.
अनेकदा टीम इंडियामध्ये कसोटी मालिका सुरू असताना स्पिनर्सला मदत मिळाली की मादी माजी खेळाडू पिचवरून टीका करताना दिसतात. रोहितने दिलेल्या वक्तव्यानरून टीकाकारांची तोंड बंद झाली असावीत. कारण नेहमी भारताला यावरून माजी खेळाडू टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार