मुंबई इंडियन्स कर्णधारपदाच्या वादावर अखेर रोहित शर्माच्या पत्नीने तोंड उघडलं, सांगितलं की…

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच अनेक घडामोडी घडल्या आहेत. खेळाडूंच्या देवाणघेवाणीसोबत कर्णधारांची अदलाबदलीही झाली आहे. त्यात मुंबई इंडियन्स कर्णधार बदलण्याचा निर्णय सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा होता. त्यामुळे अजूनही यावर चर्चा होणं काही थांबत नाही. हेड कोच मार्क बाउचरने दिलेल्या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी सहा शब्दात भावना मांडल्या आहेत.

मुंबई इंडियन्स कर्णधारपदाच्या वादावर अखेर रोहित शर्माच्या पत्नीने तोंड उघडलं, सांगितलं की...
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 1:53 PM

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 22 मार्चनंतर या स्पर्धेला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदान ठरवण्यासाठी विलंब होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी फ्रेंचायसीमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेल्य हार्दिक पांड्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने घेतलं. त्यामुळे गुजरात टायटन्सची जबाबदारी शुबमन गिलच्या खांद्यावर पडली आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचं कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडून यावर बरंच स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. दरम्यान एका पॉडकास्टला मुलाखत देताना मुंबई इंडियन्सचा हेड कोच मार्क बाउचर याने खरं कारण सांगितलं होतं. त्यावर रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह व्यक्त झाली आहे. अवघ्या सहा शब्दात काय म्हणायचं ते सांगून टाकलं आहे.

स्मॅश स्पोर्ट्स इंकवर मार्क बाउचर याने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत आपलं मन मोकळं केलं. हार्दिक पांड्याकडे जबाबदारी दिल्याने रोहित शर्मा मनमोकळेपणाने फलंदाजी करू शकेल, असं त्याने सांगितलं होतं. तसेच त्याच्याकडे टीम इंडियाची जबाबदारी आहे, त्यामुळे त्याला तणावातून मुक्त करण्याचा हेतू होता, असं मार्क बाउचरने सांगितलं होतं. त्या मुलाखतीखाली रोहित शर्माची पत्ती रितीका सजदेह हीने कमेंट्स केली आहे. ” यात खूप काही चुकीचं आहे..”, अशी सूचक कमेंट्स रितीकाने केली आहे. यावरून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आलबेल नसल्याचं दिसून आलं आहे.

Ritika_Comments

रितीका सजदेह हीच्या कमेंट्सनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. रोहित शर्माला न सांगता कर्णधारपदावरून दूर केल्याचं चर्चा रंगली आहे. जर तसं नसतं तर रितीका अशी कमेंट्सच केली नसती असा तर्कही लावला जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते पुन्हा एकदा फ्रेंचायसीच्या निर्णयावर भडकले आहेत.

मुंबई इंडियन्सची टीम

  • यष्टिरक्षक : इशान किशन, विष्णू विनोद.
  • फलंदाज: रोहित शर्मा, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, देवाल्ड ब्रेविस
  • अष्टपैलू: हार्दिक पांड्या (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड , नेहल वढेरा, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद नबी , शिवालिक शर्मा, नमन धीर.
  • गोलंदाज: जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, दिलशान मदुशंका, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाळ.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.