GT vs MI 2023 : 2 मॅचची एकच गोष्ट, फक्त 4 ओव्हरमुळे होतोय Mumbai Indians चा पराभव
GT vs MI IPL 2023 : मागच्या दोन सामन्यात एकाच चुकीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव झालाय. कॅप्टन रोहित शर्माला यावर लवकर तोडगा शोधावा लागेल. पहिले दोन सामने मुंबईने गमावले. त्यानंतर तीन विजय आणि आता पुन्हा दोन सामन्यात पराभव, अशी मुंबईची स्थिती आहे.
GT vs MI IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या टीमला यंदाच्या आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये अजून सूर सापडलेला नाहीय. या टीमने सर्वाधिक पाचवेळा विजेतेपद मिळवलय. अजूनपर्यंत मुंबई इंडियन्सने सरासरी खेळ दाखवलाय. सात पैकी फक्त तीन सामन्यात विजय झालाय. चार मॅचमध्ये पराभव पदरी आलाय. आता सलग दोन सामने मुंबई इंडियन्सने गमावलेत. मंगळवारी मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सने हरवलं. त्याआधी पंजाब किंग्सने. या दोन्ही पराभवात मुंबई इंडियन्सची एकच कमकुवत बाजू समोर आलीय.
टी 20 क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर्स खूप महत्वाच्या असतात. म्हणजे 16 ते 20 ओव्हर. या ओव्हरमध्ये चांगला चाललेला खेळ बिघडू शकतो. प्रत्येक टीम या चार ओव्हर दरम्यान टिच्चून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करते. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असतो. मागच्या दोन सामन्यात याच चार ओव्हर दरम्यान मुंबईच्या बॉलर्सनी मार खाल्लाय. ‘
त्या सामन्यातही एकच चूक
आकड्यांवर नजर टाकली तर हैराण व्हाल. पंजाब विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या चार ओव्हर्समध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी धावा लुटवल्या. गुजरात विरुद्ध सुद्धा असच झालं. मुंबई आणि पंजाबमध्ये 22 एप्रिलला मॅच झाली. या मॅचमध्ये पंजाबने पहिली बॅटिंग केली. आठ विकेट गमावून त्यांनी 214 धावा केल्या. अखेरच्या चार ओव्हर्समध्ये मुंबईने 65 रन्स दिले.
इथेच मॅच मुंबईच्या हातातून निसटली
गुजरात विरुद्ध सुद्धा कथा बदलली नाही. उलट पंजाबपेक्षा या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी जास्त धावा दिल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरात विरुद्ध शेवटच्या चार ओव्हरमध्ये 70 धावा दिल्या. 16 ओव्हर अखेरीस गुजरातची धावसंख्या चार विकेटवर 137 होती. पण 20 ओव्हरच्या अखेरीस हाच स्कोर 207 होता. याच ठिकाणी सामना मुंबईच्या हातातून निसटला. या विशाल धावसंख्येसमोर मुंबईच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 152 धावा केल्या.
Miller’s TITANic sixes ?#GTvMI #IPL2023 #JioCinema #IPLonJioCinema pic.twitter.com/BJJsmpWfGC
— JioCinema (@JioCinema) April 25, 2023
त्याच्याकडून अपेक्षा भंग
मुंबईकडे चालू सीजनमध्ये डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करु शकणाऱ्या बॉलर्सची कमतरता आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरकडून अपेक्षा होत्या. पण तो सलग सामने खेळत नाहीय. याच कारण आहे, त्याचा फिटनेस. अन्य गोलंदाजांकडे फार अनुभव नाहीय. अर्जुन तेंडुलकरने या सीजनमध्ये डेब्यु केलाय. रोहितला तोडगा काढावा लागेल
जेसन बहरनडॉर्फ आणि राइली मेरेडिथ विशेष प्रभावी ठरत नाहीयत. मुंबईने कॅमरुन ग्रीनला 17.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. पण तो गोलंदाजीत निष्प्रभ ठरलाय. डेथ ओव्हर्समध्ये धावा वाचवणाऱ्या गोलंदाजांची कमतरता स्पष्ट दिसून येतेय. रोहितला लवकरात लवकर यावर मार्ग शोधावा लागेल.