IPL 2023 : CSK टीममधील महाराष्ट्राच्या प्लेयरला MS Dhoni का संधी देत नाहीय?

RR vs CSK : 20 वर्षाचा युवा खेळाडू संधीच्या प्रतिक्षेत आहे. टॅलेंट असूनही धोनी त्याला का संधी देत नाहीय? सीजनच्या पहिल्या सामन्यात खेळताना त्याने कमाल केली होती. राजस्थान रॉयल्सने सीएसकेवर 32 धावांनी विजय मिळवला.

IPL 2023 : CSK टीममधील महाराष्ट्राच्या प्लेयरला MS Dhoni का संधी देत नाहीय?
IPL 2023 स्पर्धेत एमएस धोनीने रचला इतिहास, चेपॉकमध्ये द्विशतक ठोकत केली मोठी कामगि
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 8:06 AM

चेन्नई : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये गुरुवारी आयपीएलमधील 37 वा सामना झाला. जयपूरमध्ये ही मॅच झाली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 32 धावांनी विजय मिळवला. या मॅचसाठी धोनीने निवडलेल्या CSK च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूला संधी मिळाली नाही. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये मॅच झाली.

राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने प्लेइंग 11 मध्ये कुठलाही बदल केला नाही. धोनीने या मॅचसाठी जी टीम निवडली, त्यामुळे एका खेळाडूच मन मोडलं.

फक्त 2 मॅचमध्ये संधी दिली

आम्ही सीएसकेच्या टीममधील ज्या खेळाडूबद्दल बोलतोय, त्याच नाव आहे, राजवर्धन हंगरगेकर. राजवर्धनला सीएसकेने सीजनमधील आतापर्यंत फक्त 2 मॅचमध्ये संधी दिली.

कॅप्टन धोनी काय म्हणाला?

सीएसकेचा कॅप्टन धोनीने टॉस हरल्यानंतर गोलंदाजीबद्दल विचार व्यक्त केले. “या पीचमध्ये गती चांगली दिसतेय. पण चेंडूला उसळी कमी आहे. आम्ही आमच्या टीमच्या गोलंदाजांमध्ये चरित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे” असं धोनी म्हणाला.

राजवर्धनची कामगिरी कशी आहे?

राजवर्धन गुजरात टायटन्स विरुद्ध सीजनमधील पहिला सामना खेळला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सीजनच्या पहिल्या सामन्यात 20 वर्षाच्या राजवर्धनने कमालीच प्रदर्शन केलं. त्याने 3 विकेट घेताना, 36 धावा दिल्या. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजवर्धनने विशेष कमाल केली नाही. 24 रन्स देऊनही त्याला एक विकेट काढता आला नाही. त्यानंतर धोनीने त्याला प्लेइंग 11 च्या बाहेर बसवलं. तेव्हापासून राजवर्धन संधीच्या प्रतिक्षेत आहे. पहिल्या मॅचमध्ये कमाल, नंतर फ्लॉप

राजवर्धन हंगरगेकर टीम इंडियाकडून अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळलाय. देशातंर्गत क्रिकेटमध्ये तो महाराष्ट्राच प्रतिनिधीत्व करतो. तुळजापूरमध्ये जन्मलेला राजवर्धन आतापर्यंतच्या करियरमध्ये 4 फर्स्ट क्लास आणि 13 लिस्ट ए चे सामंने खेळलाय. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 13 विकेट घेतलेत. टी 20 करियरमध्ये राजवर्धनने 10 मॅचमध्ये 8 विकेट काढलेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.