RR vs GT, LIVE Score in Marathi: हार्दिक पंड्यामुळे गुजरातचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय
Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Score in Marathi: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांचे समान सहा गुण आहेत. पण नेट रनरेटच्या आधारावर गुणतालिकेत राजस्थानचा संघ टॉपवर आहे.
आयपीएलच्या (IPL) 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर (RR vs GT) 37 धावांनी ‘रॉयल’ विजय मिळवला. हार्दिक पंड्या या विजयाचा हिरो आहे. आज त्याने कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. गुजरातने राजस्थानला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले होते. पण राजस्थानला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 155 धावाच करता आल्या. गुजरातकडून लॉकी फर्ग्युसन आणि डेब्यू करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने (yash Dayal) प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आयपीएल स्पर्धेतील गुजरात टायटन्सचा हा पाच सामन्यांपैकी चौथा विजय आहे. राजस्थान रॉयल्सचा हा दुसरा पराभव आहे. राजस्थानने दमदार सुरुवात केली होती. पण ती लय त्यांना कायम राखता येत नाहीय.
अशी आहे गुजरातची Playing – 11
शुभमन गिल, मॅथ्यू वेड, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल,
अशी आहे राजस्थानची Playing – 11
जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कॅप्टन), रासी वॅन डार डुसे, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जिमी नीशॅम, आर अश्विन, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन
LIVE NEWS & UPDATES
-
हार्दिक पंड्यामुळे गुजरातचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय
हार्दिक पंड्यामुळे गुजरातने राजस्थानवर 37 धावांनी ‘रॉयल’ विजय मिळवला. गुजरातने राजस्थानला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले होते. पण राजस्थानला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 155 धावाच करता आल्या.
Match-winning innings ✔️ Direct-hit run-out ✔️ Caught and Bowled Wicket ✔️ #PapaPandya, aaje lottery ticket khareedi lo! ?#RRvGT | #AavaDe | #TATAIPL | #SeasonOfFirsts pic.twitter.com/reABpZy6xa
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 14, 2022
-
गुजरात विजयाच्या दिशेने, राजस्थानची आठवी विकेट
जेम्स नीशॅमच्या रुपाने राजस्थानची आठवी विकेट गेली. हार्दिक पंड्याने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला. नीशॅमने 17 धावा केल्या. राजस्थानची स्थिती आठ बाद 148 आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
-
-
राजस्थानला सातवा झटका, रियान पराग OUT
राजस्थान रॉयल्सच्या सात विकेट गेल्या आहेत. 16 ओव्हर्समध्ये त्यांच्या सात बाद 138 धावा झाल्या आहेत. रियान परागला लॉकी फर्ग्युसनने शुभमन गिलकरवी 18 धावांवर झेलबाद केलं.
-
मोहम्मद शमीने गुजरात टायटन्सला मिळवून दिली महत्त्वाची विकेट
मोहम्मद शमीने गुजरात टायटन्सला शिमरॉन हेटमायरची महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्याला राहुल तेवतियाकरवी 29 धावांवर झेलबाद केलं. 13 षटकात राजस्थानच्या सहाबाद 117 धावा झाल्या आहेत. 42 चेंडूत राजस्थानला विजयासाठी 76 धावांची आवश्यकता आहे.
-
गुजरातला मिळाली मोठी विकेट
गुजरातला मोठी विकेट मिळाली आहे. कॅप्टन संजू सॅमसन रन आऊट झाला आहे. त्याने 11 धावा केल्या. हार्दिक पंड्याच्या अचूक थ्रो ने तो रन आऊट झाला. 7.3 षटकात राजस्थानच्या चार बाद 74 धावा झाल्या आहेत.
-
-
तुफान बॅटिंग करणारा जोस बटलर क्लीन बोल्ड
तुफान बॅटिंग करणारा जोस बटलर क्लीन बोल्ड झाला. लॉकी फर्ग्युसनने यश मिळवून दिलं. पावरप्लेच्या सहा षटकात राजस्थानच्या तीन बाद 65 धावा झाल्या आहेत. जोस बटलरने 24 चेंडूत 54 धावा केल्या. यात आठ चौकार आणि तीन षटकार होते.
-
राजस्थान रॉयल्सला पहिला झटका
राजस्थान रॉयल्सला पहिला झटका. देवदत्त पडिक्कल शून्यावर OUT. दोन षटकात राजस्थान रॉयल्सच्या एक बाद 28 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 28 धावांवर खेळतोय. आज डेब्यू करणाऱ्या यश दयालने विकेट काढला.
-
हार्दिक, अभिनव, मिलरची जबरदस्त फलंदाजी
गुजरात टायटन्सकडून आज हार्दिक पंड्या कॅप्टन इनिग्स खेळला. त्याने 52 चेंडूत नाबाद 87 धावा फटकावल्या. यात आठ चौकार आणि चार षटकार होते. गुजरात टायटन्सकडून आज दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या झाल्या. हार्दिक आणि अभिनव मनोहरमध्ये चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर मिलर सोबत पाचव्या विकेटसाठी नाबाद 53 धावा जोडल्या. अभिनवने 28 चेंडूत 43 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते. डेविड मिलरने आज जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 14 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होते.
-
मिलरने केली कुलदीप सेनची धुलाई
कुलदीप सेनने टाकलेल्या 19 व्या षटकात गुजरातने 21 धावा लुटल्या. डेविड मिलरने जबरदस्त फटकेबाजी केली. 12 चेंडूत तो 30 धावांवर खेळतोय. गुजरातच्या चार बाद 179 धावा झाल्या आहेत.
-
हार्दिक पंड्या-अभिनव मनोहरची जोडी फुटली
हार्दिक पंड्या सोबत मिळून फटकेबाजी करणारा अभिनव मनोहर 43 धावांवर आऊट झाला. चहलने त्याला अश्विनकरवी झेलबाद केलं. 16 ओव्हर्समध्ये गुजरातच्या चार बाद 139 धावा झाल्या आहेत.
-
हार्दिक पंड्याची जबरदस्त फलंदाजी
गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या दमदार फलंदाजी करत आहे. त्याची हाफ सेंच्युरी पूर्ण झाली आहे. अश्विनच्या 15 व्या षटकात हार्दिकने फटकेबाजी केली. 15 षटकात गुजरातच्या तीन बाद 130 धावा झाल्या आहेत. हार्दिक 66 आणि अभिनव 36 धावांवर खेळतोय.
50* (33)
It’s 2 in 2 for #PapaPandya now! ? https://t.co/CaeXOSo3ho
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 14, 2022
-
हार्दिक पंड्याने सावरला डाव
दहा षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. गुजरात टायटन्सच्या तीन बाद 72 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 34 आणि अभिनव मनोहर 10 रन्सवर खेळतोय.
-
शुभमन गिल OUT
सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुभमन गिल आऊट झाला. त्याआधी रियान परागच्या या षटकात गुजरातने दोन चौकार लगावले होते. शुभमन गिल 13 रन्सवर आऊट झाला. त्याने हेटमायरकडे झेल दिला. सात षटकात गुजरातच्या तीन बाद 54 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 25 धावांवर खेळतोय.
-
पावरप्लेमध्ये राजस्थानने चांगली गोलंदाजी
पावरप्लेमध्ये राजस्थानने चांगली गोलंदाजी केली. सहा ओव्हर्समध्ये गुजरातच्या दोन बाद 42 धावा झाल्या आहेत.
-
हार्दिक पंड्याची फटकेबाजी
कुलदीप सेनने पाचवी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने तीन चौकार लगावले. पाच षटकात गुजरात टायटन्सच्या दोन बाद 34 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल चार आणि हार्दिक 16 धावांवर खेळतोय.
-
गुजरातला दुसरा धक्का, कुलदीपने मिळवून दिलं यश
गुजरातला दुसरा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने विजय शंकरला दोन रन्सवर आऊट केलं. ऑफ स्टम्प बाहेर जाणार चेंडू खेळताना विजय शंकरने विकेटकिपर संजू सॅमसनकडे सोपा झेल दिला. तीन षटकात टायटन्सच्या दोन बाद 16 धावा झाल्या आहेत.
-
गुजरात टायटन्सला पहिला झटका
दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चांगली सुरुवात करणारा मॅथ्यू वेड 12 रन्सवर रनआऊट झाला. डुसेने थ्रो केला होता. प्रसिद्ध कृष्णा हे षटक टाकत आहे.
-
गुजरातच्या डावाला सुरुवात
राजस्थानकडून जेम्स नीशॅमने पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये मॅथ्यू वेडने तीन चौकार लगावले. गुजरात टायटन्सच्या बिनबाद 12 धावा झाल्या आहेत. मॅथ्यू वेड, शुभमन गिल ही सलामीची जोडी मैदानात आहे.
-
अशी आहे राजस्थानची Playing – 11
जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कॅप्टन), रासी वॅन डार डुसे, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जिमी नीशॅम, आर अश्विन, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन
-
अशी आहे गुजरातची Playing – 11
शुभमन गिल, मॅथ्यू वेड, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल,
-
राजस्थानने टॉस जिंकला
राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आहे. चालू असलेल्या ट्रेंड प्रमाणे त्यांनी आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सची पहिली फलंदाजी आहे.
Toss goes #RR’s way, we’re batting first! #TitansFAM, let’s pad up! ?#RRvGT | #AavaDe | #TATAIPL | #SeasonOfFirsts
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 14, 2022
Published On - Apr 14,2022 6:59 PM