RR विरुद्ध RCB Live Score, IPL 2022: डीकेने मॅच फिरवली, RCB चा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय
Rajasthan Royals vs Royal challengers Banglore Live Score in Marathi: राजस्थान रॉयल्स आपले पहिले दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर RCB सातव्या क्रमांकावर आहे.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज एक रंगतदार सामना पहायला मिळाला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यामध्ये होते. अभेद्य, अजिंक्य वाटणाऱ्या संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय (RR vs RCB) मिळवला. चांगल्या सुरुवातीनंतर RCB चा संघ एका टप्प्यावर सामना गमावतोय असं दिसतं होतं. पण अनुभव दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शाहबाज अहमदच्या साथीने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. टी 20 क्रिकेटमधली खरी रंगत या सामन्यामधून अनुभवता आली. टी 20 तुम्ही वेगवान सुरुवात करा किंवा धीमी. सामन्याचा नूर पालटण्यासाठी एक-दोन षटक पुरेशी असतात. तेच आजच्या सामन्यात घडलं. तत्पूर्वी आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं.
LIVE Cricket Score & Updates
-
डीकेने मॅच फिरवली, RCB चा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय
शाहबाज अहमद (45) आणि दिनेश कार्तिकच्या नाबाद (44) यांच्या फलंदाजीच्या बळावर RCB ने राजस्थान रॉयल्सवर चार विकेट राखून विजय मिळवला.
JUST WOW. ???#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RRvRCB pic.twitter.com/PRt70sTWGt
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 5, 2022
-
शाहबाज अहमद आऊट
मोक्याच्याक्षणी दमदार फलंदाजी करणार शाहबाज अहमद आऊट झाला आहे. ट्रेंट बोल्टने त्याला क्लीन बोल्ड केलं. आरसीबीच्या सहाबाद 155 धावा झाल्या आहेत. शाहबाजने 26 चेंडूत 45 धावा केल्या.
-
-
दिनेश कार्तिक क्रीझवर, गेम चेंजर कोण ठरणार?
16 व्या षटकात 13 धावा निघाल्या असून आरसीबीच्या पाच बाद 138 धावा झाल्या आहेत. शाहबाजने शेवटच्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाला षटकार ठोकला.
-
RCB ला विजयासाठी 30 चेंडूत 45 धावांची आवश्यकता
RCB च्या पंधरा षटकात पाच बाद 125 धावा झाल्या आहेत. दिनेश कार्तिक 31 आणि शाहबाज 20 धावांवर खेळतोय.
-
दिनेश कार्तिकची फटकेबाजी
रविचंद्रन अश्विन टाकत असलेल्या 14 व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकने फटकेबाजी केली. त्याने 21 धावा चोपल्या. आता पाच बाद 110 अशी RCB ची स्थिती आहे.
-
-
RCB बॅकफूटवर, पाचवी विकेट
RCB ची टीम बॅकफूटवर गेली आहे. त्यांची पाचवी विकेट गेलीय. शरफोन रुदरफोर्ड पाच धावांवर बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर नवदीप सैनीने झेल घेतला. आरसीबीच्या पाच बाद 87 धावा झाल्या आहेत.
-
विराट कोहली RUNOUT, डेविड विली बोल्ड
युजवेंद्र चहल टाकत असलेल्या नवव्या षटकात RCB ची वाट लागली आहे. विराट कोहली 5 धावांवर रनआऊट झाला. पाठोपाठ डेविड विलीला चहलने क्लीन बोल्ड केलं. RCB च्या चार बाद 62 धावा झाल्या आहेत.
Chahal to Kohli ? pic.twitter.com/vRaahw1Dhb
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 5, 2022
-
RCB ला दुसरा झटका, अनुज रावत OUT
RCB ला दुसरा झटका बसला असून अनुज रावत 26 धावांवर OUT झाला. नवदीप सैनीने विकेटकिपर संजू सॅमसनकरवी झेलबाद केलं. आठ षटकात त्यांच्या दोन बाद 61 धावा झाल्या आहेत.
-
युजवेंद्र चहलने RCB ला दिला पहिला झटका
चांगल्या सुरुवातीनंतर युजवेंद्र चहलने RCB ला पहिला झटका दिला. फाफ डु प्लेसिसच्या रुपाने मोठी विकेट गेली आहे. ट्रेंट बोल्टने त्याचा झेल घेतला. डु प्लेसिसने 29 धावा केल्या. सात षटकात त्यांच्या एक बाद 55 धावा झाल्या आहेत. अनुज रावत 24 धावांवर खेळतोय.
CHAHAAAAL! ? https://t.co/wbytj2Lafz
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 5, 2022
-
बोल्टच्या एकाच ओव्हरमध्ये 3 फोर
तिसऱ्या ओव्हरमध्ये बोल्डची ओव्हर राजस्थानला चांगलीच महागात पडली. एकाच ओव्हरमध्ये तीन फोर आरसीबीच्या फलंदाजांनी लगावत तिसऱ्या ओव्हरमध्ये वेगानं धावा केल्यात.
-
फॅफ ड्युप्लेस फॉर्मात, आक्रमक अंदाजात बॅक टू बॅक फोर
तिसऱ्या ओव्हरमध्ये ड्युप्लेसीकडून दमदार धुलाई, बोल्टला बॅक टू बॅक फोर
-
बोल्टच्या स्वागत फॅफच्या फोरनं
बोल्ट बॉलिंगला येताच फॅफ ड्युप्लेसीनं फोर मारत त्याचं स्वागत केलंय.
-
आरसीबीचा पहिलाच फोर
आरसीबीच्या रावतचा इनिंगमधला पहिलाच फोर
-
अखेरच्या षटकात राजस्थानने धावगती वाढवली
धीमी सुरुवात केल्यानंतर अखेरच्या दोन-तीन षटकात फटकेबाजी करुन राजस्थान रॉयल्सने निर्धारीत 20 षटकात तीन बाद 169 धावा केल्या. पुन्हा एकदा जोस बटलरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 47 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. यात सहा षटकार होते. शिमरॉन हेटमायरने त्याला चांगली साथ दिली. 31 चेंडूत त्याने 42 धावा केल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते. चौथ्या विकेटसाठी त्यांनी नाबाद 83 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात 23 धावा वसूल केल्या.
Fifty followed by a hundred. Jos, bossing the situation. ??#RRvRCB | #RoyalsFamily | #HallaBol | #IPL2022 pic.twitter.com/OLCXgqZk2K
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 5, 2022
-
राजस्थान रॉयल्सच्या 17 षटकात 118 धावा
राजस्थान रॉयल्सच्या 17 षटकात 118 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 41 आणि हेटमायर 21 धावांवर खेळतोय.
-
राजस्थान रॉयल्सच्या 100 धावा पूर्ण
वानिंदु हसारंगाने चौदावं षटक टाकलं. शिमरॉन हेटमायरने त्या ओव्हरमध्ये एक चौकार आणि षटकार मारला. राजस्थान रॉयल्सच्या तीन बाद 100 धावा झाल्या आहेत.
Hetman’s doing his thing! ? pic.twitter.com/OIEObzkF6U
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 5, 2022
-
RCB ला मिळाली राजस्थानची मोठी विकेट
RCB ला राजस्थानची मोठी विकेट मिळाली आहे. कॅप्टन संजू सॅमसन आज स्वस्तात आऊट झाला. वानिंदु हसारंगाच्या गुगलीवर त्याने त्याच्याकडेच सोपा झेल दिला. संजूने आठ धावा केल्या. 12 षटकात राजस्थानच्या तीन बाद 86 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 33 धावांवर खेळतोय. शिमरॉन हेटमायर आता खेळपट्टीवर आला आहे.
Gone!!! Hasaranga gets his man! Sanju chips it straight back and an easy catch for Wanindu. ?#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RRvRCB pic.twitter.com/7ROgQTXRvS
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 5, 2022
-
10 षटकात 76 धावा, देवदत्त पडिक्कल OUT
10 षटकात राजस्थान रॉयल्सच्या दोन बाद 76 धावा झाल्या आहेत. देवदत्त पडिक्कल आऊट झाला. त्याने 29 चेंडूत 37 धावा केल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार होते. जोस बटलर 31 धावांवर खेळतोय. हर्षल पटेलने विराट कोहलीकरवी देवदत्तला बाद केलं.
Breakthrough right at the halfway stage! ??
Let’s keep chipping away at those wickets! ??#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RRvRCB pic.twitter.com/d9fVgICVji
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 5, 2022
-
देवदत्त पडिक्कलचा षटकार
आठव्या षटकातील डेविड विलीच्या शेवटच्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलने सुंदर षटकार खेचला. राजस्थानच्या एक बाद 61 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 23 आणि देवदत्त पडिक्कल 31 धावांवर खेळतोय.
-
जोस बटलरला जीवनदान
सातव्या षटकात आकाश दीपच्या गोलंदाजीवर चौथ्या चेंडूवर डेविड विलीने जोस बटलरचा सोपा झेल सोडला. राजस्थानच्या एक बाद 45 धावा झाल्या आहेत.
-
RCB ची टिच्चून गोलंदाजी
पावरप्लेच्या पहिल्या सहा ओव्हर्समध्ये RCB ने टिच्चून गोलंदाजी केली. राजस्थानच्या एक बाद 35 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 10 आणि देवदत्त पडिक्कल 19 धावांवर खेळतोय.
-
आकाश दीपची सुंदर गोलंदाजी
पाचव्या षटकात आकाश दीपने सुंदर स्विंग गोलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सच्या एक बाद 30 धावा झाल्या आहेत.
-
राजस्थानच्या एकबाद 25 धावा
चौथ्या षटकात शेवटच्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलने डेविड विलीला सुंदर चौकार मारला. राजस्थानच्या एकबाद 25 धावा झाल्या आहेत. देवदत्त पडिक्कल 13 आणि जोस बटलर 6 धावांवर खेळतोय.
-
देवदत्त पडिक्कल-जोस बटलर मैदानात
तीन षटकात राजस्थान रॉयल्सच्या एकबाद 17 धावा झाल्या आहेत. मोहम्मद सिराजच्या षटकात 11 धावा काढल्या.
-
देवदत्त पडिक्कलचा षटकार
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला देवदत्त पडिक्कलने लेगसाईडला सुंदर षटकार मारला.
-
RR ची पहिली विकेट
राजस्थान रॉयल्सला पहिला झटका बसला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज डेविड विलीच्या अप्रतिम चेंडूवर यशस्वी जैस्वाल क्लीन बोल्ड झाला. दोन षटकात राजस्थानच्या एक बाद 6 धावा झाल्या आहेत.
WICKET! There’s the first strike! Willey castles Jaiswal. Absolute ripper! \|/#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RRvRCB
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 5, 2022
-
जोस बटलर-यशस्वी जैस्वालची जोडी मैदानात
पहिल्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने टिच्चून गोलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सच्या बिनबाद दोन धावा झाल्या आहेत. जोस बटलर-यशस्वी जैस्वालची जोडी मैदानात आहे.
-
अशी आहे RR ची प्लेइंग -11
संजू सॅमसन (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्क्ल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी,
-
अशी आहे RCB ची प्लेइंग -11
Faf has won the toss and we will be bowling first. ??
No changes in the Playing XI for tonight as well. ✅
It’s GO time! ????#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RRvRCB pic.twitter.com/qPMqoFVlUD
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 5, 2022
Published On - Apr 05,2022 7:15 PM