RR vs SRH IPL 2023 Highlights | हैदराबादचा राजस्थानवर सनसनाटी विजय

| Updated on: May 07, 2023 | 11:24 PM

RR vs SRH IPL 2023 Highlights In Marathi | हैदराबाद विरुद्ध राजस्थान या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ होती. हैदराबादने राजस्थानवर शेवटच्या बॉलवर सनसनाटी विजय मिळवला. अब्दुल समद हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला.

RR vs SRH IPL 2023 Highlights | हैदराबादचा राजस्थानवर सनसनाटी विजय

जयपूर | आयपीएल 16 व्या मोसमात आज रविवारी 7 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. तर यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. राजस्थानचा यंदाच्या मोसमातला हा 11 वा तर सनरायजर्स हैदराबाद टीमचा 10 वा सामना होते. राजस्थान रॉयल्सने हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने शानदार पद्धतीने या धावांचा पाठलाग केला. हैदराबादला शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. तेव्हा संदीप शर्मा याने अब्दुल समद याला कॅच आऊट केलं. मात्र तो बॉल नो बॉल होता. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी 1 बॉलमध्ये 4 धावांची गरज होती. तेव्हा समद कडक सिक्स ठोकत हैदराबादला थरारक विजय मिळवून दिला. संदीप शर्मा याचा एक न बॉल गेमचेंजर ठरला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 07 May 2023 11:15 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादचा सनसनाटी विजय

    सनरायजर्स हैजराबादने राजस्थान रॉयल्सवर 4 विकेट्सने सनसनाटी विजय मिळवला आहे. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. तेव्हा अब्दुल समद याने संदीप शर्मा याच्या बॉलवर सिक्स ठोकत हैदराबादला सनसनाटी विजय मिळवून दिला.

  • 07 May 2023 11:12 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादला शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज

    हैदराबादला विजयासाठी 1 बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना अब्दुल समद याने फटका मारला. मात्र  तो कॅच आऊट झाला. पण संदीप शर्मा याने टाकलेला बॉल नोबॉल होता. त्यामुळे 1 धावा मिळाली. त्यामुळे शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज आहे.

  • 07 May 2023 11:06 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादला विजयासाठी 1 बॉलमध्ये 5 धावांची गरज

    हैदराबादला विजयासाठी 1 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. अब्दुल समद स्ट्राईकवर आहे.

  • 07 May 2023 11:05 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादला 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज

    हैदराबादला विजयासाठी 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे.

  • 07 May 2023 11:04 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | अब्दुल समद याचा कडक सिक्स

    अब्दुल समद याने 20 ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर कडक सिक्स मारला, त्यामुळे आता हैदराबादला विजयासाठी 4 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे.

  • 07 May 2023 11:02 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादला विजयासाठी 17 धावांची गरज

    हैदराबादला विजयासाठी 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. हैदराबादकडून एम यानसन आणि अब्दुल समद हे दोघे खेळत आहेत. तर संदीप शर्मा शेवटची आणि निर्णायक ओव्हर टाकत आहे.

  • 07 May 2023 11:00 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | ग्लेन फिलीप्स याचा धमाका

    ग्लेन फिलीप्स याने सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादव याच्या बॉलिंगवर पहिल्या 3 बॉलमध्ये सलग 3 सिक्स ठोकले. तर चौथ्या बॉलवर चौकार ठोकला. मात्र कुलदीप यादवने पाचव्या बॉलवर ग्लेन फिलिप्स आऊट झाला. ग्लेन फिलिप्सयाने 7 बॉलमध्ये  25 धावा केल्या. त्यामुळे सामना आणखी रंगतदार झाला.

  • 07 May 2023 10:48 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादला चौथा झटका

    युजवेंद्र चहलने हैदराबादला चौथा झटका दिला आहे. राहुल त्रिपाठी 47 धावा करुन आऊट झाला.

  • 07 May 2023 10:37 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादला विजयासाठी 69 धावांची गरज, सामना रंगतदार स्थितीत

    हैदराबादला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 69 धावांची गरज आहे. हैदराबादने 15 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 146 धावा केल्या आहेत.

  • 07 May 2023 10:25 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | अभिषेक शर्मा आऊट

    हैदराबादने दुसरी विकेट गमावली आहे. अभिषेक शर्मा 33 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली.

  • 07 May 2023 09:56 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादला पहिला धक्का

    हैदराबादने सलामी अर्धशतकी भागीदारीनंतर पहिली विकेट गमावली आहे. अनमोलप्रीत सिंह याने 25 बॉलमध्ये 33 धावांची खेळी केली.

  • 07 May 2023 09:45 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादची आश्वासक सुरुवात

    हैदराबादची 215 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली आहे. हैदराबादच्या सलामी जोडीने 5 ओव्हरमध्ये 45 धावांची सलामी भागीदारी केली आहे.

  • 07 May 2023 09:37 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | अनमोलप्रीत सिंगची आक्रमक खेळीला सुरुवात

  • 07 May 2023 09:27 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | अनमोलप्रीत सिंग आणि अभिषेक शर्मा जोडी मैदानात

  • 07 May 2023 09:17 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादला 215 धावांचं आव्हान

    जॉस बटलर आणि संजू सॅमसन या दोघांनी केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं मजबूत टार्गेट दिलंय. राजस्थानकडून जॉस बटलर याने सर्वाधिक 95 धावांची खेळी केली. बटलरने 59 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 10 चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. संजू सॅमसनने 38 बॉलमध्ये 4 चौकार आणिन 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 66 रन्स केल्या. यशस्वी जयस्वाल याने 18 बॉलमध्ये 5 कडक फोर आणि 2 गगनचुंबी सिक्सच्या मदतीने वेगवान 35 धावा केल्या. तर शिमरॉन हेटमायर याने नाबाद 7 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मार्को जान्सेन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 07 May 2023 09:07 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | राजस्थानला दुसरा झटका

    राजस्थानला दुसरा धक्का लागला आहे. जॉस बटलर याने 59 बॉलमध्ये 95 धावा केल्या. बटलरचं अवघ्या 5 धावांसाठी शतक हुकलं.

  • 07 May 2023 09:01 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | कॅप्टन संजू सॅमसन याचा धमाका

    संजू सॅमसन याने हैदराबाद विरुद्ध  33 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. संजूचं हे या मोसमातील सलग चौथं अर्धशतक ठरलं.

  • 07 May 2023 08:38 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

    संजू सॅमसन आणि जॉस बटलर या जोडीने 61 बॉलमध्ये शतकी भागीदारी केली आहे. यासह राजस्थान मजबूत स्थितीत पोहचली आहे.

  • 07 May 2023 08:26 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | जॉस द बॉस! बटलरचं अर्धशतक

    जॉस बटलर याने 32 बॉलमध्ये संयमी अर्धशतक पूर्ण केलं आहे. बटलरचं हे या मोसमातील चौथं अर्धशतक ठरलं आहे.

  • 07 May 2023 08:18 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर आणि संजू सॅमसन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 07 May 2023 07:58 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | राजस्थानला चांगल्या सुरुवातीनंतर पहिला धक्का

    यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर या सलामी जोडीने राजस्थानसाठी 54 धावांची भागीदारी केली. मात्र यशस्वी 35 धावा करुन आऊट झाला.  यशस्वीने फक्त 18 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने या धावा केल्या.

  • 07 May 2023 07:33 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | जयस्वाल-बटलर सलामी जोडी मैदानात, राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात

    राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. राजस्थानच्या कॅप्टन संजू सॅमसन याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

  • 07 May 2023 07:15 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबाद प्लेइंग इलेव्हन

    सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन

  • 07 May 2023 07:13 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन

    राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल.

  • 07 May 2023 07:05 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला, सामना कोण जिंकणार?

    राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन संजू सॅमसन याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राजस्थान घरच्या मैदानात किती मोठा स्कोअर करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 07 May 2023 06:29 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | आकडेवारी कुणाच्या बाजूने?

    राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैजराबाद हो दोन्ही संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 17 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामध्ये राजस्थान आणि हैदारबाद हे दोन्ही संघ जवळपास तुल्यबळ आहे. राजस्थानने 17 पैकी 9 सामन्यात हैदराबादवर मात केली आहे. तर हैदराबादने 8 वेळा विजयश्री खेचून आणली आहे.

  • 07 May 2023 05:59 PM (IST)

    RR vs SRH IPL 2023 Live Score | राजस्थान-हैदराबाद दुसऱ्यांदा आमनेसामने

    राजस्थान विरुद्ध हैदराबाद हे दोन्ही संघ  या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. या आधी हे उभयसंघ 2 एप्रिलला भिडले होते. तेव्हा राजस्थानने हैदराबादवर 72 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता.

Published On - May 07,2023 5:54 PM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.