Sanju Samson IPL 2023 : OUT, नो-बॉल, फ्रि हिट, सिक्स, अखेर पराभव, संजू सॅमसनच्या 2 चुकांमुळे राजस्थानची हार, VIDEO
RR vs SRH : राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन दमदार इनिंग खेळला. 66 धावा करुन त्याने 214 पर्यंत टीमची धावसंख्या पोहोचवली. पण विकेटपाठी त्याने खराब कामगिरी केली, ज्याचा फटका राजस्थान रॉयल्सला बसला.
जयपूर : राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये काल आयपीएलमधला रोमांचक सामना झाला. राजस्थानने शेवटच्या चेंडूवर सामना गमावला. या सामन्याचा निकाल दीर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहिल. शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने विकेट घेतला होता, पण तो नो-बॉल होता, हे सहजासहजी विसरता येणार नाही. त्यानंतर फ्रि-हिटवर सिक्स आणि राजस्थानचा पराभव. राजस्थानच्या या पराभवाचा मुख्य कारण संजू सॅमसन सुद्धा आहे. त्याने एक नाही, दोन-दोन चुका केल्या, ज्याचा फटका टीमला बसला.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉय्लसने जोरदार सुरुवात केली होती. पण आता त्याच टीमचं सूर हरवल्याच चित्र आहे. याला सॅमसन सुद्धा जबाबदार आहे. या सीजनमध्ये त्याने अशा काही चुका केल्या की, त्यामुळे मॅचची दिशा बदलली. रविवारी 7 मे रोजी जयपूरमध्ये हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सुद्धा हेच चित्र दिसलं.
विकेट काढण्य़ाची संधी वाया घालवली
सॅमसनने बॅटिंग करताना कमाल केली. तो 66 धावांची दमदार इनिंग खेळला. पण विकेटकिपिंग त्याने तितकी चांगली केली नाही. त्याने दोनवेळा विकेट काढण्य़ाची संधी वाया घालवली. त्याचा टीमला फटका बसला. सर्वात पहिली संधी 12 व्या ओव्हरमध्ये मिळाली होती.
पहिली संधी कधी वाया घालवली?
ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला रनआऊट करण्याची संधी होती. पण संजूने घाईगडबडीत चेंडू पकडण्याआधीच बेल्स उडवले. अभिषेक शर्माने त्यावेळी 40 रन्सवर खेळत होता. तो 55 रन्सवर आऊट झाला.
17 व्या ओव्हरमध्ये दुसरी चूक
म्हणजे 15 रन्सच नुकसान झालं. दुसरी चूक सॅमसनने 17 व्या ओव्हरमध्ये केली. यावेळी ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर लेग साइडला राहुल त्रिपाठीची सोपी कॅच घेण्याची संधी होती. पण सॅमसनने 2-3 प्रयत्नानंतरही ही कॅच सोडली. राहुल त्रिपाठी त्यावेळी 40 रन्सवर खेळत होता. त्याने 47 रन्स केल्या.
This is the best league in the world and you can’t change our minds ?
Congrats Samad, hard luck, Sandeep!#RRvSRH #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/phHD2NjyYI
— JioCinema (@JioCinema) May 7, 2023
.
…तर, तो सिक्स बसलाच नसता
दोन्ही फलंदाज फार मोठी इनिंग खेळले नाहीत. पण या दोन चुकांमुळे टीमच 22 धावांनी नुकसान झालं. या दोन चुका सोडल्यास राजस्थानकडे सामना जिंकण्याच्या आणखी काही संधी होत्या. पण राजस्थानचा त्याचा फायदा उचलता आला नाही. लास्ट ओव्हरच्या पहिल्या बॉलवर ओबेड मेकॉयने अब्दुल समदची कॅच सोडली. त्यानेच लास्ट बॉलवर सिक्स मारुन हैदराबादला विजय मिळवून दिला.