Ruturaj Gaikwad: 6,6,6,6,6,6,6…ऋतुराज गायकवाडने एकाच ओव्हरमध्ये 7 SIX कसे मारले? पहा VIDEO
गायकवाडने एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स कसे मारले? ते इन डिटेल जाणून घ्या....
नवी दिल्ली: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा रेकॉर्ड बनतात. हे रेकॉर्ड पाहून लोक हैराण होतात. सोमवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने असाच कारनामा केला. ज्याबद्दल फार कोणी विचार केला नसता. ऋतुराज क्लासिक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली. त्याने यूपी विरुद्ध डबल सेंच्युरी झळावली.
गायकवाडने 159 चेंडूत 220 धावा फटकावल्या. गायकवाडने आपल्या इनिंगमध्ये एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम केला.
क्रिकेट विश्वातील असा पहिला फलंदाज
ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राच्या इनिंगमध्ये 49 व्या षटकात 7 षटकार मारले. एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार ठोकणारा ऋतुराज गायकवाड क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज आहे. यूपीचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंहच्या गोलंदाजीवर ऋतुराजने ही कामगिरी केली.
‘सिक्सर किंग’ गायकवाड
गायकवाडने एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स कशा मारल्या? डिटेलमध्ये जाणून घ्या त्याची ही कामगिरी.
पहिला सिक्स: ऋतुराजने शिवा सिंहच्या पहिल्या चेंडूवर लॉन्ग ऑनच्या वरुन सिक्स मारला. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. पण ऋतुराजने हा चेंडू हाफ वॉली बनवला.
दुसरा सिक्स: गायकवाडने दुसरा सिक्स गोलंदाजाच्या डोक्यावरुन मारला. हा सिक्स एकदम फॅल्ट होता.
तिसरा सिक्स: तिसरा चेंडू शिवा सिंहने थोडा शॉर्ट टाकला. गायकवाडने मिडविकेटच्या डोक्यावरुन सिक्स मारला.
चौथा चेंडू: गायकवाडने चौथा सिक्स लॉन्ग ऑफवरुन मारला. यावेळी चेंडू फुल टाकला होता. ऑफ स्टम्पच्या बाहेर होता. गायकवाडने प्योर टायमिंगने त्याला सीमारेषेपार पोहोचवलं.
6⃣,6⃣,6⃣,6⃣,6⃣nb,6⃣,6⃣
Ruturaj Gaikwad smashes 4⃣3⃣ runs in one over! ??
Follow the match ▶️ https://t.co/cIJsS7QVxK…#MAHvUP | #VijayHazareTrophy | #QF2 | @mastercardindia pic.twitter.com/j0CvsWZeES
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 28, 2022
पाचवा सिक्स: गायकवाडने पाचवा सिक्स लॉन्ग ऑफच्यावरुन मारला. यावेळी चेंडू नो बॉल होता. शिवा सिंहने चेंडू क्रीजच्या पुढून टाकला होता.
सहावा सिक्स: गायकवाडने फ्री हिट चेंडूवरही सिक्स मारला. त्याने मिडविकेटच्यावरुन सिक्स मारला. गायकवाडने अशा प्रकारने पाच चेंडूत 6 सिक्स मारुन डबल सेंच्युरी झळकावली.
सातवा सिक्स: गायकवाडने 7 वा सिक्सही मिडविकेटच्या वरुन मारला.