IND vs SA | टीम इंडियाची नवी ओपनिंग जोडी मैदानात, महाराष्ट्राच्या वाघासोबत उतरणार ‘हा’ खेळाडू  

Team India New Opening Pair against South Africa : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी जाहीर केलेल्या वन डे संघामध्ये युवा खेळाडू आहेत. आता ओपनिंगला आयपीएल फायनलमध्ये 96 धावा करणारा खेळाडू उतरणार आहे. पाहा कोण आहे जाणून घ्या.

IND vs SA | टीम इंडियाची नवी ओपनिंग जोडी मैदानात, महाराष्ट्राच्या वाघासोबत उतरणार 'हा' खेळाडू  
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 9:46 PM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.  बीसीसीआयने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांची निवड केली आहे. वन डे सामन्यांसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी के. एल. राहुल याची निवड केली आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. वन डे सामन्यांसाठीही युवा खेळाडूंची निवड करण्यात आली असून केएल राहुलला नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. 

टीम इंडियाला मिळाली नवी ओपनिंग जोडी

तीन वन डे सामन्यामध्ये टीम इंडियासाठी नव्या दमाचे खेळाडू ओपनिंग करताना दिसणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा वाघ म्हणजे ऋतुराज गायकवाड सलामीला खेळताना दिसू शकतो. ऑस्ट्रेलियावरूद्धच्या टी-20 मालिकेमध्ये शतक करणाऱ्या ऋतुराजसाठी लॉटरी लागल्यासारखी आहे. त्याच्यासोबत आयपीएल फायनलमध्ये चेन्नईविरूद्ध 96 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या साई सुदर्शन याला ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते.

बीसीसीआयने वन डे मालिकेसाठी निवडलेल्या संघामध्ये ओपनिंगला येणारा दुसरा कोणताही खेळाडू नाही. रजत पाटीदार एक पर्याय असेल मात्र दोघांच्या तुलनेमध्ये त्याला फार कमी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन हेच ओपनिग करताना दिसतील. भारताच्या भविष्याच्या विचार करता हे दोन खेळाडू महत्त्वाच आहेत.

दरम्यान, आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा ऋतुराज वन डे मध्ये भारतासाठी ओपनिंग करेल. मुळचा पुण्यातील पुरंदर तालुक्यामधील असलेल्या ऋतुराजने एशियन गेम्समध्ये भारतीय संघाचं कर्णधारपदही भूषवलं आहे.

3 वनडेसाठी भारताचा संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C&W), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.