दुष्काळात तेरावा महिना, दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड IND vs SL मालिकेतून बाहेर, नव्या सलामीवीराला संधी
भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) मैदानात सातत्याने चांगली कामगिरी करत असून विजय मिळवत आहे. पण मैदानाबाहेर संघाला खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. संघातील अनेक खेळाडू दुखापतींशी सतत झुंज देत असून या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) मैदानात सातत्याने चांगली कामगिरी करत असून विजय मिळवत आहे. पण मैदानाबाहेर संघाला खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. संघातील अनेक खेळाडू दुखापतींशी सतत झुंज देत असून या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. एका वृत्तानुसार, 26 आणि 27 तारखेला धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यांमध्येही ऋतुराज खेळू शकणार नाही. ऋतुराजच्या जागी बॅकअप म्हणून मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) संघात समावेश करण्यात आला आहे.
ऋतुराज गायकवाड लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळणार होता, परंतु सामन्यापूर्वी त्याच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली. कर्णधार रोहित शर्माने याबाबत माहिती दिली होती. मनगटाच्या दुखापतीमुळे ऋतुराजला फलंदाजीत अडचणी येत असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही अपडेट जारी केले होते. वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत असल्याचे बोर्डाने सांगितले होते.
मयंक चंदीगडहून धर्मशाला येथे दाखल
दुखापतीमुळे या युवा फलंदाजाला (ऋतुराज) संपूर्ण मालिकेतून बाहेर बसावे लागणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, ऋतुराजच्या जागी सलामीवीर मयंक अग्रवालला तातडीने धर्मशाला येथे पाठवण्यात आले आहे. बॅकअप ओपनर म्हणून मयंक टीम इंडियाशी जोडला गेला आहे. मयंक अग्रवाल सध्या चंदीगडमध्ये भारतीय खेळाडूंसोबत कसोटी मालिकेची तयारी करत होता. अशा परिस्थितीत मयंकला एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये ट्रान्सफर करणे संघ व्यवस्थापनासाठी सोपे होते. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मयंकचा बॅकअप म्हणून समावेश करण्यात आला होता.
ऋतुराजचं दुर्दैव
ऋतुराज गायकवाडच्या टीम इंडियात स्थान मिळवण्याच्या मार्गात सातत्याने अडथळे येत आहेत. याआधी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामुळे तो तिन्ही सामने खेळू शकला नाही. त्यानंतर वेस्ट इंडिजसोबतच्या टी-20 मालिकेत त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. आता श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळणार होती. परंतु दुखापतीमुळे त्याला त्याला संघाबाहेर बसावं लागणार आहे.
दुष्काळात तेरावा महिना
टीम इंडियाकडे सलामीवीरांची मोठी फौज आहे. ज्यात कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, इशान किशन, संजू सॅमसन, के.एल. राहुल, वेंकटेश अय्यर यांचा त्यात समावेश आहे. यापैकी केवळ दोन किंवा तीन खेळाडूंचा संघात समावेश करता येऊ शकतो. त्यामुळे ऋतुराजला संधी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यातच दुखापत आणि कोरोनाने त्याची संधी दोनदा हिरावली.
इतर बातम्या
IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा