Ruturaj Gaikwad : गायकवाड यामध्ये बेस्ट म्हणूनच…लवकर मिळणार मोठी संधी, रोहित-गंभीरचा मोठा निर्णय

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका आणि T20 सीरीजसाठी निवड झाली नाही. याची बरीच चर्चा झाली. आता ऋतुराज गायकवाड बाबत एक चांगली बातमी आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर यांनी त्याच्यासाठी एक चांगला आणि मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Ruturaj Gaikwad : गायकवाड यामध्ये बेस्ट म्हणूनच...लवकर मिळणार मोठी संधी, रोहित-गंभीरचा मोठा निर्णय
ruturaj gaikwadImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 1:03 PM

बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका आणि T20 सीरीजसाठी ऋतुराज गायकवाडच सिलेक्शन झालं नाही. आता त्याला टीम इंडियात संधी मिळेल अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला टीममध्ये सिलेक्ट केलं जाऊ शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार गायकवाड तिसरा ओपनर म्हणून ऑस्ट्रेलियाला जाईल. गायकवाड सध्या इराणी ट्रॉफीमध्ये खेळतोय. रेस्ट ऑफ इंडियाचा तो कॅप्टन आहे. TOI च्या वृत्तानुसार गायकवाडचा ऑस्ट्रेलियात दौऱ्यात ओपनर म्हणून समावेश करण्यात येणार आहे. प्लेइंग इलेवनमध्ये यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा नियमित ओपनर असतील.

गरज पडल्यास ऋतुराज गायकवाडला सुद्धा ही जबाबदारी मिळू शकते. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली किंवा त्याचा फॉर्म बिघडला, तर गायकवाडला संधी मिळू शकते. टीम इंडिया डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या सीरीजमध्ये पाच टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. ऋतुराज गायकवाडची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होत असेल, तर त्यामागे हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन रोहित शर्माच डोकं आहे.

सध्याचा फॉर्म कसा?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेक्निकली सॉलिड फलंदाजाची गरज आहे असं रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांचं म्हणणं आहे. गायकवाड यामध्ये बेस्ट आहे. शॉर्ट बॉल विरुद्ध तो चांगला खेळू शकतो. त्याचा सध्याचा फॉर्मही चांगला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीज आधी टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध तीन टेस्ट मॅचची सीरीज खेळायची आहे. ऋतुराज गायकवाडला यामध्ये सुद्धा संधी मिळू शकते.

कॅप्टन बनवणार का?

गायकवाडला इंडिया ए सोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवलं जाऊ शकतं. इंडिया ए ची टीम या महिन्यात ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. 31 ऑक्टोबरला इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए मध्ये अनधिकृत टेस्ट मॅच खेळली जाणार आहे. 7 नोव्हेंबरला दुसरा अनधिकृत कसोटी सामना खेळला जाईल. ऋतुराज गायकवाडला इंडिया ए च कॅप्टन बनवलं जाऊ शकतं.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.