Sreesanth on Gambhir | टीम इंडियातील या खेळाडूचा गंभीर करायचा अपमान, श्रीसंतने वादानंतर केला खुलासा!

Gautam Gambhir & S Sreesanth Fight : गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यातील वादानंतर श्रीसंतने व्हिडीओ पोस्ट करत मोठा खुलासा केला आहे. गंभीर संघातील खेळाडूंचा आदर करत नसल्याचं म्हणत श्रीसंतने जाहीरपणे एका खेळाडूचं नाव घेतलं आहे.

Sreesanth on Gambhir | टीम इंडियातील या खेळाडूचा गंभीर करायचा अपमान, श्रीसंतने वादानंतर केला खुलासा!
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 5:40 PM

मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि एस श्रीसंत भर सामन्यात एकमेकांना भिडले. सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. लीजेंड लीगच्या एलिमिनेटरचा सामना इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यामध्ये गंभीर आणि श्रीसंतमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आधी एकमेकांना खुन्नस दिली त्यानंतर ब्रेकमध्ये एकमेकांना काहीतरी बोलत असल्याचं दिसलं. सामना संपल्यावर या वादावर बोलताना श्रीसंतने एक व्हिडीओ पोस्ट करत गंभीरवर निशाणा साधताना खळबळजनक आरोप केला आहे.

श्रीसंत काय म्हणाला?

मिस्टर फायटरसोबत नेमकं काय झालं ते मी या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट करत आहे. गौतम गंभीर मला काय म्हणाला हे मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे. त्याने मला वापरलेले शब्द हे क्रिकेटच्या मैदानावर कधीच वापरले जाऊ शकत नाहीत. माझ्या कुटुंबासह राज्याला खूप काही सहन करावं लागलं आहे. सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मी लढलोय. मात्र आता काही लोक विनाकारण मला अपमानित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं श्रीसंतने म्हटलं आहे.

जो विनाकारण कोणासोबतही भांडतो, काही कारण नसताना तो माझ्याशी भांडला असून तो जे काही बोललाय ते खूप वाईट होतं. तशा प्रकारे गंभीरने माझ्याशी बोलायला नव्हतं पाहिजे. संघातील वीरेंद्र सेहवागसह इतर सहकाऱ्यांचाही तो आदर करायचा नाही. जेव्हा शोवळी गंभीरला विराटबद्दल विचारलं जातं तेव्हा तो त्याच्याबद्दल बोलत नाही. जर तुम्ही संघातील खेळाडूंचा आदर करू शकत नसाल तर लोकांचं प्रतिनिधित्त्व करण्याला काय अर्थ आहे. मला जास्त खोलात जायचं नसल्याचं श्रीसंतने म्हणाला.

दरम्यान,  गंभीर ज्या पद्धतीने मला त्याने मी आणि माझं कुटुंब दुखावलं गेलं आहे. मी त्याला काहीच उलट बोललो नसून एक शब्दसुद्धा बोललो नाही ना शिवीगाळ केली. गंभीर तेच बोलला जे कायम बोलत आला आहे, श्रीसंतने सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.