कॅप्टन K L Rahul मालिका विजयानंतर गंभीर चेहऱ्याने संजू सॅमसनबाबत काय म्हणाला?
K L Rahul On Sanju Samson | संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिके विरुद्ध एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं. संजूने 108 धावांच्या शतकी खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार फटकावले.
पार्ल | केएल राहुल याच्या नेृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडेत 78 धावांनी विजय मिळवत मालिकाही जिंकली. संजू सॅमसन याने केलेल्या 108 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाच्या बॉलिगंसमोर ऑलआऊट 218 धावाच करता आल्या. अर्शदीप सिंह याने सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या.
विराट कोहली याच्यानंतर टीम इंडियाने केएलच्या कॅप्टन्सीत दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका विजय मिळवला. टीम इंडियाने 2-1 ने सीरिज जिंकली. त्यासाठी कॅप्टन म्हणून केएल राहुल याचं अभिनंदन होत आहे. विजयानंतर केएल राहुल याने प्रतिक्रिया दिली. त्याने युवा खेळाडूंचं कौतुक केलं. तसेच केएलने संजू सॅमसनबाबत असं काही म्हटलं की जे सर्वांनाच पटलं. केएल नक्की काय म्हणाला हे आपण समजून घेऊयात.
केएल राहुल काय म्हणाला?
“मला सहकाऱ्यांसह राहायला कायम आवडतं. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर कमबॅक केल्यानं आनंद झालाय. मी या खेळाडूंसह आयपीएलमध्ये खेळलो. त्यांच्यासह इथे एकत्र खेळल्याने आनंद झालाय. तुम्ही खेळाचा आनंद लुटा, असंच मी सहकाऱ्या म्हटलेलं. तुमची कामगिरी आणि इतर बाबींची चिंता करु नका, असं मी त्यांना म्हटलेलं. या खेळाडूंपैकी काही अनुभवी आहेत. तर काहींना फारसा अनुभव नाही. त्यांना एकरुप होण्यासाठी थोडं वेळ देणं गरजेचं आहे. या सर्वांनी 100 टक्के प्रयत्न केले.” असं केएल म्हणाला.
संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये अभूतपूर्व कामगिरी करणारा खेळाडू आहे. मात्र संजूला दुर्दैवाने आणि विविध कारणांमुळे फारशी संधी मिळाली नाही. मात्र त्याने आज जे कय केलंय ते पाहून मला निश्चितच आनंद झाला”, असं केएलने नमूद केलं.
केएल राहुल संजू सॅमसनबाबत म्हणाला….
Well played Sanju, well done Captain KL 👏🌟#SanjuSamson #KLRahul #INDvsSA #Cricket pic.twitter.com/Fwj5Tl9Q5I
— cricketuncut (@cricketunc89165) December 21, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.