Sanju Samson ची शतकी खेळी, बायसेप दाखवत टीकाकारांना चोख उत्तर
Sanju Samson Maiden Odi Century | वन मॅन आर्मी! संजू सॅमसनने टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. संजूने शतका दरम्यान तिलक वर्मा याच्यासह शतकी भागीदारीही केली.
पार्ल | संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात झुंजार, चिवट शतक ठोकलंय. संजूच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठोकलं. टीम इंडिया अडचणीत असताना संजू सॅमसन याने हे शतक ठोकल्याने त्याला आणखी महत्तव प्राप्त झालं. संजूच्या या शतकी खेळीमुळे टीम इंडियाच्या डावाला स्थिरता मिळण्यात मोठी मदत मिळाली.
संजू टीम इंडियाचा गेल्या अनेक वर्षांपासून भाग आहे. मात्र त्याला त्या तुलनेत हव्या तशा संधी मिळाल्या नाहीत. तर जेव्हा संधी मिळाली तेव्हा संजूला फार विशेष असं करता आलं नाही. मात्र संजूने आता अचूक वेळ साधत शतक ठोकलं. संजूने अवघ्या 110 चेंडूंच्या मदतीने 90.91 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. यामध्ये 3 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.
संजूने त्याआधी 66 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर त्यानंतर पुढील 50 धावा या संजूने 44 चेंडूत पूर्ण केल्या. संजूने पहिल्या 50 च्या तुलनेत नंतरच्या 50 धावा या झटपट पूर्ण केल्या. मात्र संजूला 100 नंतर मोठ्या खेळीत त्याचं रुपांतर करण्यात अपयश आलं. संजू 114 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 108 धावा करुन आऊट झाला.
सोशल मीडियावर संजूचं अभिनंदन
𝐌𝐀𝐈𝐃𝐄𝐍 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃
The wait is over! @IamSanjuSamson scores his first century for India and it has come off 110 balls in the decider at Paarl. 👏🏾👏🏾 https://t.co/nSIIL6gzER #TeamIndia #SAvIND pic.twitter.com/DmOcsNiBwC
— BCCI (@BCCI) December 21, 2023
दरम्यान टीम इंडियासाठी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडियाला दक्षिणआफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचं आव्हान देता आलं.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.