SA vs IND | तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 78 धावांनी विजय, 2-1 ने मालिका जिंकली
South Africa vs India 3rd Odi Match Result | South Africa vs India 3rd Odi Match Result | दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज फ्लॉप ठरले होते. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने शानदार कामगिरी केली.
पार्ल | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 45.5 ओव्हरमध्ये 218 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झोर्झी याने सर्वाधिक 81 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांसमोर टोनी डी झोर्झीशिवाय एकालाही टिकता आलं नाही. अर्शदीप सिंह, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा, हे तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. तर इतरांनीही चांगलं योगदान दिलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-1 ने जिंकली आहे.
सामन्यातील पहिला डाव
दरम्यान त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.काही विकेट्स गमावल्यानंतर मधल्या फळीत संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह या तिघांनी टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली. संजू सॅमसन याने पहिलंवहिलं शतक तर तिलक वर्मा याने पहिलंवहिलं अर्धशतक लगावलं. तर रिंकू सिंह याने फिनिशिंग टच दिला.
टीम इंडियाकडून संजूने 108 आणि तिलकने 52 धावांची खेळी केली. तर रिंकूने अखेरी येऊन 38 धावा केल्या. या तिघांशिवाय रजत पाटीदार याने 22, कॅप्टन केएल याने 21 आणि साई सुदर्शनने 10 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतरांना विशेष काही करता आलं नाही. टीम इंडियाने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 296 पर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून ब्यूरन हेंड्रिक्स याने 3 विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर याला 2 विकेट्स मिळाल्या. तर लिझाद विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज या तिघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दक्षिण आफ्रिकेकडून ओपनर टोनी डी झोर्झी याने सर्वाधिक 81, रिझा हेंडीक्स 19, रॅसी व्हॅन डर ड्युसेन 2, कॅप्टन एडन मारक्रम 36 आणि हेनरिक क्लासेन याने 21 धावा केल्या. डेव्हिड मिलर याने 10, केशव महाराज याने 14 आणि ब्यूरन हेंड्रिक्स याने 18 धावांचं योगदान दिलं. नांद्रे बर्गर 1 वर नाबाद परतला. तर तिघांना 2 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
टीम इंडियाचा मालिका विजय
India’s young brigade clinch the ODI series 2-1 after a throughly convincing victory in the final match 👊
📝 #SAvIND: https://t.co/XDucAXYbE6 pic.twitter.com/4LKSUO2mSA
— ICC (@ICC) December 21, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.