SA vs IND : वर्मा-शर्माचा धमाका, सेंच्युरियनमध्ये तिलक-अभिषेकची फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेला 220चं आव्हान

South Africa vs India 3rd T20i : तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा या युवा जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 219 धावांपर्यंत मजल मारली आहे.

SA vs IND : वर्मा-शर्माचा धमाका, सेंच्युरियनमध्ये तिलक-अभिषेकची फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेला 220चं आव्हान
tilak varma and abhishek sharmaImage Credit source: Bcci x Account
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 10:41 PM

भारतीय क्रिकेट संघाने सेंच्युरियन येथे खेळवण्यात येत असलेल्या तिसऱ्या टी 20I सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं आहे. तिलक वर्मा याचं शतक आणि अभिषेक शर्मा याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. भारताची दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. वर्मा आणि शर्मा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तिलक वर्मा याने सर्वाधिक नाबाद 107 धावा केल्या. तर अभिषेक शर्मानेही अर्धशतकी खेळी करत तिलकला चांगली साथ दिली.

टीम इंडियाची बॅटिंग

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मार्को यान्सेन याने दुसर्‍याच बॉलवर संजू सॅमसन याला झिरोवर आऊट केलं. त्यानंतर अभिषेक आणि तिलक या दोघांनी दे देणादण बॅटिंग करत धावा कुटल्या. दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. अभिषेकने 24 बॉलमध्ये करिअरमधलं दुसरी फिफ्ट केली. मात्र दुसऱ्याच बॉलवर अभिषेक स्टंपिंग झाला. त्यानंतर टीम इंडियाने 2 विकेट्स ठराविक अंतराने गमावल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव 1 आणि हार्दिक पंड्या 18 धावा करुन आऊट झाला.

त्यानंतर तिलक आणि रिंकु सिंह या दोघांनी काही वेळ डाव सावरला. मात्र रिंकूला या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. रिंकु 8 धावांवर बाद झाला. रिंकूनंतर डेब्युंटंट रमणदीप सिंह मैदानात आला. रमणदीपने पहिल्याच बॉलवर सिक्स खेचत अप्रतिम सुरुवात केली. मात्र रमनदीपला शेवटपर्यंत टिकून खेळता आलं नाही. रमनदीप 15 धावांवर बाद झाला. तर तिलक वर्मा आणि अक्षर पटेल नाबाद परतले. तिलक वर्माने 56 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 8 फोरसह नॉट आऊट 107 रन्स केल्या. तर अक्षर 1 धावेवर नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि अँडिले सिमेलेन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्को यान्सेन याने 1 विकेट घेतली.

वर्मा-शर्माचा धमाका

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.