Mohammed Siraj | मानलं भावा तुला, साऊथ आफ्रिकेच्या भूमीत सिराजने रचला इतिहास

Mohammed Siraj Record : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये सिराजच्या वादळासमोर आफ्रिकेचा संघ नतमस्तक झाला आहे. सिराजच्या भेदक माऱ्यासह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Mohammed Siraj | मानलं भावा तुला, साऊथ आफ्रिकेच्या भूमीत सिराजने रचला इतिहास
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 5:02 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना केप टाऊन येथे सुरू आहे. आफ्रिका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजचा दिवस टीम इंडियाच्या गोलंदाजांनी गाजवला. आफ्रिका संघाचा पहिला डाव 55 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद सिराज याच्या घातक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाजांनी नांगी टाकली. एकट्या सिराजनेच सहा विकेट तर बुमराह आणि मुकेश कुमारने दोन विकेट घेतल्या. सिराजने आज सहा विकेटसह मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो टीम इंडियाचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

मोहम्मद सिराज याने आफ्रिका संघाच्या बॅटींग लाईन अपला सुरूंग लावला होता. पठ्ठ्याने सहा विकेट घेत यजमान आफ्रिका संगाला बॅकफूटला ढकललं. साऊथ आफ्रिकेमध्ये अशी कामगिरी करणारा सिराज तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोहम्मद सिराज याने फक्त पंधरा धावा खर्च करत पाचपेक्षा जास्त विकेट घेतल्या.

साऊथ आफ्रिकेमध्ये एका डावात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम शार्दुल ठाकुर याच्या नावावर होता. शार्दुल ठाकुर याने 2022 साली 61 धावा देत 7 विकेट घेतल्या होत्या. त्याआधी हरभनज सिंह याने 2011 साली 120 धावा देत 7 विकेट घेतल्या होत्या. तर मोहम्मद सिराज याने या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे.  सिराजने आणखी एक विकेट घेतली असती तर तो यादीमध्ये पहिल्या स्थानी असता. महत्त्वाचं म्हणजे सिराजने अवघ्या पंधरा धावा देत 6 विकेट घेतल्या आहेत. पहिल्या सेशनमध्येच सहा विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार

डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.