SA vs IND T20i : 16 विरुद्ध 15, टीम इंडिया विरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफिकेचा संघ जाहीर
South Africa vs India T20i Serires : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरूद्धच्या मायदेशातील टी 20i मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पाहा कुणाला संधी मिळाली?
टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची टी20I मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियानंतर आता दक्षिण आफ्रिकेने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. एडन मारक्रम हा या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या मालिकेसाठी 2 नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. तर काही खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे.
या दोघांना विश्रांची
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आणि कगिसो रबाडा या दोघांना विश्रांती दिली आहे. एन्गिडीला बांगलादेश दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतरही आता या टी20i सीरिजमध्येही समावेश करण्यात आलेला नाही. तर रबाडा बांगलादेश विरूद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनचा भाग आहे. त्यामुळे रबाडाला आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेआधी विश्रांती देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्खिया आणि स्पिनर तबरेज शम्सी या दोघांकडे निवड समितीकडून दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
या दोघांचं कमबॅक
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या संघात डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन या अनुभवी खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात काही महिन्यांपूर्वी टी 20i वर्ल्ड कप अंतिम सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर मिलर आणि क्लासेन हे दोघे टी 20i क्रिकेटपासून दूर होते. त्यामुळे हे दोघे वर्ल्ड कपमधील पराभवानंतर थेट आता टीम इंडिया विरुद्ध भिडणार आहेत.
तसेच निवड समितीने 2 अनकॅप्ड खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ऑलराउंडर मिहलाली मोंगवाना आणि एंडीले सिमेलाने यांचा समावेश आहे. तसेच डोनोव्हन फरेरा आणि पॅट्रिक क्रूगर यांनाही संधी दिली गेली आहे.
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 8 नोव्हेंबर, डरबन
दुसरा सामना, 10 नोव्हेंबर,
तिसरा सामना, 13 नोव्हेंबर, सेंच्युरियन
चौथा सामना, 15 नोव्हेंबर, जोहान्सबर्ग
16 विरुद्ध 15
Aiden Markram will lead a strong South Africa lineup for the home T20I series against India 👊#SAvINDhttps://t.co/aAIODe89ag
— ICC (@ICC) October 31, 2024
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.
T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.