IND vs SA : टीम इंडियाची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत दाखल, एकूण किती सामने खेळणार?

South Africa vs India T20i Series 2024 : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकूण 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादवचा हा कॅप्टन म्हणून दुसरा दौरा आहे.

IND vs SA : टीम इंडियाची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत दाखल, एकूण किती सामने खेळणार?
team india suryakumar yadav
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 8:57 PM

टीम इंडियाला मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाा 3-0 ने धुव्वा उडवला. भारताला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. त्यानंतर आता टीम इंडियाची युवा ब्रिगेड सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी आज 4 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक खास व्हीडिओ पोस्ट केला आहे. बीसीसीआयने पोस्ट केलेला व्हीडिओत खेळाडूंमध्ये प्रश्न उत्तरांचा तास रंगला.

युवा खेळाडूंना संधी

बीसीसीआय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंना संधी दिली आहे. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकु सिंह, रमनदीप सिंह आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्या याचाही समावेश आहे. तसेच विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांना विकेटकीपर म्हणून संधी मिळाली आहे. तर आवेश खान, यश दयाल, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांचाही समावेश आहे.

उभयसंघातील या मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा 8 नोव्हेंबरला होणार आहे. दुसरा सामना हा 10 नोव्हेंहबरला होणार आहे. तिसरा सामना 13 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. तर चौथा आणि अंतिम सामन्याचा थरार 15 नोव्हेंबरला रंगणार आहे.

टीम इंडियाची युवा ब्रिगेड

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.