SA vs IND | टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल, सूर्यकुमार म्हणाला…..
Team India Tour Of South Africa 2023-2024 | टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत पोहचताच टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव काय म्हणाला व्हीडिओत पाहा.
केप टाऊन | सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला टी 20 मालिकेत 4-1 ने लोळवल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळण्यासाठी उत्सूक आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 10 डिसेंबरपासून टी 20 मालिकेने सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचे खेळाडू हे दक्षिण आफ्रिकेतेलील डरबनमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय खेळाडूंचं एकदम जंगी स्वागत यावेळेस करण्यात आलं. बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्वागताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतातून बुधवारी 6 डिसेंबर रोजी निघाली. त्यानंतर टीम इंडिया अनेक तासांच्या प्रवासानंतर दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली. टी 20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड या दोघांचं हॉटलेमध्ये टाळ्यांच्या कडकडाटासह स्वागत करण्यात आलं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओत सूर्यकुमार कॅमेऱ्याकडे पाहून म्हणतो की हाय मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेत आपलं स्वागत आहे.
टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात ही 10 डिसेंबरपासून टी 20 मालिकेने होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेनंतर उभयसंघात एकदिवसीय आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी टीम इंडियाचं 3 वेगवेगळे खेळाडू हे कॅप्टन्सी करणार आहेत. टी 20 आणि वनडे सीरिजमधून अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व अनुभवी खेळाडू हे कसोटी मालिकेत खेळताना दिसतील.
3 मालिका 8 सामने
उभयसंघात 10 डिसेंबर रोजी डरबनमध्ये पहिला टी 20 सामना होईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना हा अनुक्रमे 12 आणि 14 डिसेंबर रोजी होईल. त्यानंतर 17 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. 19 डिसेंबर रोजी दुसरा आणि 21 डिसेंबरला तिसरा आणि अंतिम सामना होईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील अखेरच्या अर्थात कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेतून नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली परततील. सेंच्युरियनमध्ये 26 डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा आणि अंतिम सामना हा नववर्षात 3 जानेवारीपासून खेळवण्यात येईल.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
South Africa bound ✈️🇿🇦#TeamIndia are here 👌👌#SAvIND pic.twitter.com/V2ES96GDw8
— BCCI (@BCCI) December 7, 2023
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.
टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी (फिटनेसवर अवलंबून) आणि प्रसीध कृष्णा.