SA vs NED Toss | दक्षिण आफ्रिकाने नेदरलँड्स विरुद्ध टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
South Africa vs Netherland Toss | अखेर एक तासाच्या प्रतिक्षेनंतर टॉस झाला आहे. नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकाच्या बाजूने लागला आहे.
धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज मंगळवारी 17 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. धर्मशाळामध्ये हा सामना पार पडणार आहे. पावसामुळे खेळपट्टी ओली असल्याने टॉस अपेक्षित वेळेपेक्षा तब्बल 1 तास 2 मिनिटांनी विलंब झाला. दुपारी 2 वाजून 32 मिनिटांनी टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत नेदरलँड्सला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
वेळापत्रकानुसार टॉस दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी होतो. तर सामन्याला 2 वाजता सुरुवात होते. मात्र पावसामुळे आणि खेळपट्टीमुळे टॉसला विलंब झाला. त्यानंतर 2 वाजता टॉस होणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा टॉसला आणखी उशीर झाला. मात्र अखेर 2 वाजून 32 मिनिटांनी टॉस उडवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर नेदरलँड्सने विजयी खातं उघडलेलं नाही. त्यामुळे एका बाजूला दक्षिण आफ्रिका विजयी हॅटट्रिकसाठी तयार आहे. तर नेदरलँड्स पहिला विजय मिळवण्यसााठी तयार आहे.
दोन्ही टीममध्ये एक बदल
दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल केला आहे. नेदरलँड्समध्ये रायन क्लेन याच्या जागी लोगन व्हॅन बीक याचा समावेश करण्यात आला आहे.तर दक्षिण आफ्रिका टीममध्ये गेराल्ड कोएत्झी याला तबरेज शम्सी याच्या जागी घेतलं आहे.
पावसामुळे ओव्हर कटिंग
दरम्यान पावसाने घोल घातल्याने सामना सुरु व्हायला विलंब झाला आहे. त्यामुळे खेळ वेळात संपवण्यासाठी 7 ओव्हर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता 50 ऐवजी 43 ओव्हरचा गेम होणार आहे.
दक्षिण आफ्रिका टॉसचा बॉस
Toss news from Dharamsala 📰
South Africa win the toss and elect to bowl first 🏏#SAvNED 📝: https://t.co/guZPmcKD4N pic.twitter.com/dkIQyWL9FD
— ICC (@ICC) October 17, 2023
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.