अरेरे, एका बॉलमध्ये Mumbai Indians चा ‘गेम’, श्वास रोखून धरायला लावणारी लास्ट ओव्हर

मुंबई इंडियन्स केपटाऊनने पहिली बॅटिंग केली. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 165 धावा केल्या. रासी वान डर डुसैंने सर्वाधिक 43 रन्स केल्या.

अरेरे, एका बॉलमध्ये Mumbai Indians चा 'गेम', श्वास रोखून धरायला लावणारी लास्ट ओव्हर
SA T20 leagueImage Credit source: DurbansSG Twitter
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 8:23 AM

डरबन – दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये MI केपटाऊन आणि डरबन सुपर जायंट्समध्ये रोमांचक सामना खेळला गेला. फक्त एका बॉलने मुंबई इंडियन्सचा खेळ बिघडवला. डुआन यानसनच्या एका बॉलवर जायंट्सने केपटाऊनच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. मुंबई इंडियन्स केपटाऊनने पहिली बॅटिंग केली. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 165 धावा केल्या. रासी वान डर डुसैंने सर्वाधिक 43 रन्स केल्या. टार्गेटचा पाठलाग करायला उतरलेल्या जायंट्सच्या टीमने एक चेंडू आणि 5 विकेट राखून विजय मिळवला. जायंट्सने हा सामना जिंकून सलग 4 सामन्यातील पराभवाची मालिका संपवली.

मॅन ऑफ द मॅच कोण ठरला?

जायंट्ससाठी क्विंटन डि कॉकने सर्वाधिक 63 धावा केल्या. त्यालाच प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. नाबाद 48 धावा करणारा मॅथ्यू ब्रीत्ज विजयाचा हिरो ठरला. त्याने केपटाऊनच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. दोन्ही टीम्समध्ये लास्ट ओव्हरमध्ये संघर्ष सुरु होता.

कशी होती लास्ट ओव्हर?

लास्ट ओव्हरमध्ये जायंट्सला विजयासाठी 6 चेंडूत 6 धावांची आवश्यकता होती. यानसनच्या हाती चेंडू होता. मॅथ्यू आणि डेविड विलीची जोडी क्रीजवर होती. या ओव्हरमध्ये सगळ्यांचेच श्वास रोखले गेले होते. पहिल्या 3 चेंडूंवर जायंट्सने 3 धावा काढल्या. शेवटच्या 3 चेंडूंवर जायंट्सला विजयासाठी 4 धावांची आवश्यकता होती. असा मिळाला विजय

जायंट्स आणि केपटाऊन टीममधील खेळाडूंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. एका छोट्याशा चुकीमुळेही विजयापासून वचिंत रहाव लागलं असतं. त्याचवेळी यानसनच्या एका चेंडूवर जायंट्सला बायचा एक रन्स मिळाला. त्यानंतर जायंट्सला शेवटच्या 2 चेंडूत 2 धावांची गरज होती. या 2 रन्स न देण्याचा यानसनचा प्रयत्न होता. मॅथ्यूज त्याच्यासमोर होता. यानसच्या बॉलवर मॅथ्यूने फाइन लेगच्या वरुन सिक्स मारला आणि सुपर जायंट्सच्या टीमला बहुप्रतिक्षित विजय मिळाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.