IND vs ENG 2nd ODI: लॉर्ड्स वर सचिनचं दर्शन झालं आणि पुढे काय झालं, ते बघा…VIDEO

IND vs ENG 2nd ODI: क्रिकेटच्या मैदानात मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या (Lords) मैदानात गुरुवारी भारत आणि इंग्लंडचे (IND vs ENG) संघ आमने-सामने उतरले.

IND vs ENG 2nd ODI: लॉर्ड्स वर सचिनचं दर्शन झालं आणि पुढे काय झालं, ते बघा...VIDEO
sachin-sourav Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 9:01 PM

मुंबई: क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या (Lords) मैदानात गुरुवारी भारत आणि इंग्लंडचे (IND vs ENG) संघ आमने-सामने उतरले. या सामन्याच्यावेळी चाहत्यांनी मैदानात जे दृश्य बघितलं, ते पाहून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) दोघे उपस्थित होते. दोघांना सामन्यादरम्यान एकत्र स्टँडसमध्ये पाहण्यात आलं. दोघांनी महान फलंदाजांमध्ये गणना होते. दोघे सलामीवीर म्हणून यशस्वी ठरले आहेत.

आज अनेक वर्षानंतर स्टेडियम मध्ये दोघे एकत्र दिसले. सचिन आणि सौरव प्रेक्षक गॅलरीत बसून सामन्याचा आनंद लुटत होते. कॅमेरा या दोघांकडे वळताच लॉर्ड्सच्या मैदानील भारतीय चाहत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. जवळपास 30 सेकंद कॅमेरा दोघांवर होता. यावेळी प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. सचिन-सौरवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. याआधी 8 जुलैला लंडन मध्ये सौरवचा वाढदिवस झाला. त्यावेळी दोघे एकत्र दिसले होते.

लॉर्ड्सशी सौरवचं खास नातं

सौरव गांगुलीची भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणना होते. लॉर्ड्सशी सौरव गांगुलीच एक वेगळं नात आहे. याच मैदानावर सौरव गांगुलीने कसोटी क्रिकेट मध्ये डेब्यु केला होता. भारताने याच मैदानावर 2002 साली नॅटवेस्ट ट्रॅाफी जिंकली. त्यावेळी सौरवने लॉर्ड्सच्या बाल्कनी मध्ये उभं राहून आपला टी शर्ट काढून फिरवला होता. त्यासाठी सौरव गांगुलीवर बरीच टीका सुद्धा झाली.

सचिनची 100 शतकं, पण…

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 100 शतकं झळकावली आहेत. जवळपास प्रत्येक मैदानावर त्याने शतक झळकावलं आहे. पण लॉर्ड्स वर शतक झळकावण सचिनला जमलं नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.