Sachin Tendulkar : सिराजच्या पायात स्प्रिंग असल्यासारखं वाटतं, सचिन तेंडुलकरच्या शाबासकीनंतर मोहम्मद सिराज म्हणाला…

मोहम्मद सिराजच्या पायात स्प्रिंग आहे, असं वाटत असल्याचं सचिन तेंडुलकर म्हणाला. सिराजची गोलंदाजी पाहायला आवडत असल्याचं सचिन तेंडुलकर म्हणाला

Sachin Tendulkar : सिराजच्या पायात स्प्रिंग असल्यासारखं वाटतं, सचिन तेंडुलकरच्या शाबासकीनंतर मोहम्मद सिराज म्हणाला...
सचिन तेंडुलकर मोहम्मद सिराज
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 10:48 AM

नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं टीम इंडियाचा बोलर मोहम्मद सिराज याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मोहम्मद सिराजच्या पायात स्प्रिंग आहे, असं वाटत असल्याचं सचिन तेंडुलकर म्हणाला. सिराजची गोलंदाजी पाहायला आवडत असल्याचं सचिन तेंडुलकर म्हणाला. सचिन तेंडुलकर यानं कौतुक केल्यानंतर मोहम्मद सिराजनं देखील थँक्यू सचिन सर म्हणत आभार मानले आहेत.

सचिन तेंडुलकर नेमकं काय म्हणाला?

सिराजच्या पायात स्प्रिंग असल्यासारखं वाटतं. तो पूर्णपणे उर्जेने भरलेला आहे. सिराजला बॉलिंग करताना आपण जेव्हा पाहतो त्यावेळी अंदाज लावू शकत नाही की तो दिवसाची पहिली ओव्हर टाकतोय की शेवटची ओव्हर टाकतोय. सिराज हा लगेच अनेक गोष्टी आत्मसात करतो. तो परिपूर्ण वेगवान गोलंदाज आहे, असं सचिन तेंडुलकर म्हणाला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचची आठवण

सचिन तेंडुलकरनं मोहम्द सिराज हा प्रत्येक वेळी नव्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. ऑस्ट्रेलि विरुद्धच्या त्याच्या पहिल्या कसोटीमध्ये त्यानं पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात तीन विकेट घेत परिपक्व गोलंदाज असल्याचं दाखवून दिलं होतं. सिराज त्याच्या बॉलिंगने विरोधी खेळाडूंवर दबाव निर्माण करतो, असंही सचिन तेंडलुकर म्हणाला.

थँक्यू सचिन सर, सिराजनं मानले आभार

तुमच्याकडून मला मोठ्या प्रमाणात प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळतं. थँक्स सचिन सर असं म्हणत मोहम्मद सिराजनं सचिन तेंडलकर विषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. माझ्या देशासाठी जे काही सर्वोत्तम देता येईल ते देणार असल्याचं मोहम्मद सिराजनं म्हटलं. तब्येतीची काळजी घ्या, असं देखील मोहम्मद सिराज म्हणाला.

सिराज सध्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर

मोहम्मद सिराज हा सध्य टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

इतर बातम्या:

IPL 2022 Mega Auction: लिलावाची तारीख ठरली, बंगळुरुत ‘या’ दिवशी जमणार संघ मालक

IPL 2022: ब्रायन लारा आणि डेल स्टेनने IPL मधील ‘या’ संघाच्या प्रशिक्षकपदाची स्वीकारली जबाबदारी

sachin tendulkar appreciate mohammed siraj then siraj also said thanks to Master Blaster

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.