सारा तेंडुलकर गोव्यात, नेटीझन्सनी विचारलं, ‘भाई शुभमन गिल तू कुठे आहेस?’

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर इन्स्टाग्रामवर एकमेकाला फॉलो करतात. दोघेही एकमेकाच्या कुटुंबालाही फॉलो करतात. शुभमन गिल साराच्या कुटुंबातील सगळ्यांनाच फॉलो करतो, तर सारा शुभमनच्या बहिणींना फॉलो करते.

सारा तेंडुलकर गोव्यात, नेटीझन्सनी विचारलं, 'भाई शुभमन गिल तू कुठे आहेस?'
सारा तेंडुलकर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 3:04 PM

मुंबई: सारा तेंडुलकर (Sara tendulkar) सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. सारा भारताचा अव्वल क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी आहे. सारा नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. सोशल मीडियाने सारा तेंडुलकरचे नाव क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडले आहे. दोघांमध्ये कथित अफेअर सुरु असल्याच्या बातम्या अधनं-मधनं येत असतात. ख्रिस्मसच्या पार्श्वभूमीवर सारा सध्या गोवा फिरायला गेली असून तिने तिथून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर सध्या कमेंटसचा पाऊस पडतोय.

साराचा फोटो व्हायरल सारा तेंडुलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते. तिने हातात गुलाबाचे एक फूल पकडले आहे. या फोटोमध्ये सारा खूपच सुंदर दिसतेय. तिने काळ्या रंगाचा गॉगल लावला असून तिच्या गळ्यात एक चैन आहे. या फोटोमध्ये साराच्या चेहऱ्यावर गोड हसू आहे. साराच्या या फोटोवर तिची मैत्रीण कनिका कपूरनेही कमेंट केली आहे.

लोकांच्या गमतीशीर कमेंट साराचा हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अनेक युझर्सनी मजेदार कमेंट केल्या आहेत. लोकांची तिची स्तुती करतानाच शुभमन गिलबद्दलही विचारले आहे. एका युजरने भाई, शुभमन गिल तू कुठे आहेस? असा प्रश्न विचारला आहे. सिंगर कनिका कपूरने ‘माय गर्ल’ म्हणून कमेंट केली आहे.

शुभमनच्या बहिणीला फॉलो करते सारा शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर इन्स्टाग्रामवर एकमेकाला फॉलो करतात. दोघेही एकमेकाच्या कुटुंबालाही फॉलो करतात. शुभमन गिल साराच्या कुटुंबातील सगळ्यांनाच फॉलो करतो, तर सारा शुभमनच्या बहिणींना फॉलो करते. त्यावरुन नेटीझन्सच्या मनात प्रश्न निर्माण झालेत. सारा इन्स्टाग्रामवर शुभमनची बहिण सेहनिलला फॉलो करते. साराने अलीकडेच मॉडलिंगमध्ये पाऊल ठेवले आहे.

मी अजूनही सिंगलच या कथित अफेअरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शुभमन गिलने काही दिवसांपूर्वी तो सिंगला असल्याचा दावा केला होता. शुभमन गिलने इन्स्टाग्रामवर प्रश्नोतराच्या चर्चांमध्ये सिंगल असल्याचे म्हटले होते.

संबंधित बातम्या:

PKL8: महाराष्ट्राचा सुपुत्र यूपीचा आधारस्तंभ, हलाखीच्या परिस्थितीवर मात करणाऱ्या श्रीकांत जाधवची गोष्ट घरोघरी सिलेंडर पोहोचवणाऱ्याच्या मुलाचं IPL मध्ये फळफळेल नशीब; 2022च्या लिलावात लागू शकते मोठी बोली India vs South Africa: कोणाला बसवायचं, कोणाला खेळवायचं? कोहली-द्रविड जोडी समोर मोठा पेच

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.