Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाने निवडली IPL 2022 मधील बेस्ट प्लेइंग-11, भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज संघाबाहेर

Sachin Tendulkar: सचिनने आपल्या युट्यूब चॅनलवर आयपीएल 2022 मधली त्याची बेस्ट प्लेइंग 11 सांगितली. सचिनने सलामीच्या जोडीसाठी शिखर धवन आणि जोस बटलरची निवड केलीय.

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाने निवडली IPL 2022 मधील बेस्ट प्लेइंग-11, भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज संघाबाहेर
Sachin Tendulkar Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 4:38 PM

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग 2022 (IPL 2022) चा सीजन संपला आहे. आता या सीजनचं विश्लेषण सुरु आहे. कुठल्या खेळाडूने दमदार कामगिरी केली. कोणाचं काय चुकलं. रणनिती कशी असायला हवी होती, अशा अनेक मुद्यांवर दिग्गज खेळाडू आपआपली मत मांडत आहेत. आयपीएल 2022 चा सीजन सुरु असताना भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) खूप Active होता. आता सीजन संपला असून सचिन तेंडुलकरने आपली बेस्ट प्लेइंग- 11 निवडली आहे. स्पर्धेतील खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या आधारावर सचिनने संघ निवडला आहे. सचिनने निवडलेल्या त्याच्या बेस्ट प्लेइंग इलेवनचं वैशिष्टय म्हणजे रोहित शर्मा, (Rohit sharma) विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या खेळाडूंचा समावेश नाहीय. भारतीय क्रिकेटमधील या तीन दिग्गजांना सचिनने आपल्या संघातून आऊट केलय. अनेकांसाठी हे आश्चर्यकारक आहे.

सलामीसाठी बटलरसोबत भारतीयाची निवड

सचिनने आपल्या युट्यूब चॅनलवर आयपीएल 2022 मधली त्याची बेस्ट प्लेइंग 11 सांगितली. सचिनने सलामीच्या जोडीसाठी शिखर धवन आणि जोस बटलरची निवड केलीय. बटलर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. तेच शिखर धवनला त्याच्या अनुभवामुळे संधी दिली आहे.

‘या’ खेळाडूला सचिनने बनवलं टीमचा कॅप्टन

सचिनने तिसऱ्या स्थानासाठी भारतीय संघाचा उपकर्णधार के.एल.राहुलची निवड केली आहे. राहुल रन मशीन बनलाय, तोच गुण सचिनला जास्त भावला आहे. चौथ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याला स्थान मिळालय. हार्दिकने या स्पर्धेत उत्तम नेतृत्वगुण दाखवले. त्यामुळे त्याला संघाचं कॅप्टन बनवण्यात आलय.

सचिनच्या टीममध्ये धोकादायक इंग्लिश खेळाडू

त्याच्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मिलर आणि दिनेश कार्तिकची निवड केली आहे. गोलंदाजांमध्ये सचिनने मोहम्मद शामी, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलचा समावेश केलाय.

सचिनने निवडलेली Playing 11

हार्दिक पंड्या (कॅप्टन), जोस बटलर, शिखर धवन, केएल राहुल, डेविड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक, राशिद खान, मोहम्मद शमाी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल,

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.