टीम इंडियाच्या फायद्यासाठी रवींद्र जाडेजाचा संघातील रोल बदलणार

रवींद्र जाडेजाचा (Ravindra jadeja) आता बॅटिंग ऑलराऊंडर मध्ये समावेश केला पाहिजे, असं संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी म्हटलं आहे.

टीम इंडियाच्या फायद्यासाठी रवींद्र जाडेजाचा संघातील रोल बदलणार
रवींद्र जडेजाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 9:31 AM

मुंबई: रवींद्र जाडेजाचा (Ravindra jadeja) आता बॅटिंग ऑलराऊंडर मध्ये समावेश केला पाहिजे, असं संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी म्हटलं आहे. संजय मांजरेकर हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहे. सध्या ते कॉमेंटेटरच्या रोल मध्ये आहेत. आशिया कप (Asia cup) मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जाडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने फटकावलेल्या 35 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. हार्दिक पंड्यासोबतची भागीदारी निर्णायक ठरली. शेवटच्या षटकात मोठा फटका खेळताना मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर जाडेजा बाद झाला. रवींद्र जाडेजा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही. पण पाकिस्तान विरुद्ध प्रमोशन देऊन टीम मॅनेजमेंटने सगळ्यांना हैराण करुन सोडलं. टीम इंडियाच्या या चालीमुळे पाकिस्तानही हैराण झाला. जाडेजा वरती फलंदाजीला येईल, याची त्यांनी कल्पना केली नव्हती.

मांजरेकरांना जाडेजाबद्दल एक गोष्ट आवडली

जाडेजाला फलंदाजीसाठी वरती पाठवण्याची टीम इंडियाची रणनिती संजय मांजरेकरांना आवडली. “रवींद्र जाडेजाकडे आता बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून पाहिलं पाहिजे. जाडेजाला वरती पाठवणं ही एक चागंली चाल होती. मला ती चाल आवडली. हा जुगार होता, असं मला वाटत नाही. पाकिस्तानचे दोन फिरकी गोलंदाज त्यावेळी गोलंदाजी करत होते. त्यात एक लेग स्पिनर आणि दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज होता. मोहम्मद नवाज आणि शादाब खान गोलंदाजी करत होते. ते काही वेळ गोलंदाजी करणार होते. डावखुऱ्या फलंदाजाने मैदानावर येऊन पाकिस्तानच समीकरण बिघडवलं. पीचवर चेंडू टर्न होत होता” असं संजय मांजरेकर म्हणाले.

भारतासाठी चांगले संकेत

“मर्यादीत षटकाच्या क्रिकेट मध्ये रवींद्र जाडेजाकडे फलंदाजी ऑलराऊंडर म्हणून पाहिलं पाहिजे. त्याने दोन ओव्हर गोलंदाजी केली. पाकिस्तान विरुद्ध त्याने चांगलं योगदान दिलं. फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर येऊन चांगली कामगिरी केली. हे भारतासाठी चांगले संकेत आहेत” असं संजय मांजरेकर म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.