Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजू सॅमसनच्या तोंडाला पुन्हा पानं पुसली! संघातील अशी निवड काय कामाची? रंगली चर्चा

संजू सॅमसन हे सध्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात चर्चेत असलेलं नाव.. संघात असला आणि नसला तरी सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा होत असते. अनकेदाच्या त्याच्या निवडीवरून वादाची ठिणगी देखील पडली आहे. मात्र तरीही संजू सॅमसनने आपला कूल अंदाज काही सोडला नाही. आता पुन्हा एकदा संजू सॅमसनची टीम इंडियात निवड झाली आहे. पण पदरी उपेक्षाच पडली अशी क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा आहे.

संजू सॅमसनच्या तोंडाला पुन्हा पानं पुसली! संघातील अशी निवड काय कामाची? रंगली चर्चा
संजू सॅमसनच्या पदरी पुन्हा एकदा उपेक्षाच, निवड अशी झाली की सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 9:08 PM

मुंबई : दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या तीन संघांची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20, केएल राहुलच्या नेतृत्वात वनडे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात कसोटी संघ खेळणार आहे. तिन्ही संघातील खेळाडूच्या नावाची चर्चा रंगली आहे. रोहित शर्माने फक्त कसोटीचं कर्णधारपद स्वीकारल्याने तो व्हाईट बॉल क्रिकेट खेळणार की नाही याबाबत चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टी20 ची धुरा सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत रोहित आणि विराट कोहली खेळणार की नाही याबाबतही प्रश्न विचारले जात आहे. याबाबत आता आयपीएल 2024 स्पर्धेनंतर काय ते कळेल. असं असताना दुसरीकडे वनडे संघात निवड झालेल्या संजू सॅमसनच्या नावाची चर्चा रंगली आहे. आक्रमक शैलीसाठी प्रचलित असलेल्या संजू सॅमसनची वनडे संघातील निवड आश्चर्याचा धक्का देणारी आहे. कारण टी20 संघाऐवजी वनडेत त्याची निवड म्हणजे तोंडाला पानं पुसल्यासारखीच आहे, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत.

वनडे क्रिकेट स्पर्धेची जवळपास एकही आयसीसी स्पर्धा नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 रोजी होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याने भारतीय संघ खेळणार की नाही याबाबतही संभ्रम आहे. आशिया कप 2023 स्पर्धा पाकिस्तानात खेळण्यास भारताने नकार दिला होता. त्यामुळे या स्पर्धेचं संयुक्तरित्या श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे आयसीसी मोठी स्पर्धा आता जवळपास तरी नाही. तर पुढचा वनडे वर्ल्डकप 2027 ला होणार आहे. त्यामुळे ही निवड संजू सॅमसनला फायद्याची नसल्याची चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत.

संजू सॅमसनची निवड आशिया कपमध्ये राखीव खेळाडू म्हणून झाली होती. पण त्याला शेवटपर्यंत बेंचवरच बसावं लागलं. अखेर शेवटच्या काही सामन्यांपूर्वी तो मायदेशी परतला होता. आता संजू सॅमसनला वनडे संघात संधी मिळाली आहे. पण त्या संधीचं मोठ्या स्पर्धेसाठी सोनं करणं कठीण आहे. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वी टी20 संघात स्थान मिळवण्याची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे संघात स्थान मिळवण्यासाठी जबरदस्त खेळीचं प्रदर्शन करावं लागेल.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वनडे संघ : ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान , अर्शदीप सिंग, दीपक चहर.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....