Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : संजू सॅमसनचं विक्रमी आणि विस्फोटक शतक, सूर्यकुमारचा रेकॉर्ड ब्रेक

Sanju Samson Century: संजू सॅमसन याने एकाच सामन्यात टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. संजूने अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावत सूर्यकुमारचा रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे.

IND vs BAN : संजू सॅमसनचं विक्रमी आणि विस्फोटक शतक, सूर्यकुमारचा रेकॉर्ड ब्रेक
Suryakumar Yadav and Sanju samsonImage Credit source: Bcci x Account
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 8:32 PM

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने गेल्या अनेक वर्षांची भरपाई एकाच सामन्यात केली आहे. संजूने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात स्फोटक आणि विक्रमी शतक केलं आहे. संजूने आधी अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर संजूने पुढील 18 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. संजूच्या टी20I कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. संजूने यासह कॅप्टन सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे. मात्र संजूची रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढण्याची संधी थोडक्यात हुकली.

संजूने या खेळीत सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या 4 बॉलमध्ये सलग 4 चौकार ठोकले. त्यानंतर संजूने सातव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिक्ससह अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर संजूने एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकले. संजूने टॉप गिअरमध्ये बॅटिंग सुरुच ठेवत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. संजूने 13 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून टी20I आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलं शतक झळकावलं. संजूने 250 च्या स्ट्राईक रेटने 8 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं.

हे सुद्धा वाचा

दुसरा भारतीय

संजू यासह टीम इंडियाकडून टी20I मध्ये वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. संजूने याबाबतीत सूर्यकुमार यादव याला मागे टाकलं. टीम इंडियाकडून वेगवान शतक करण्याचा विक्रम हा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे.

टी 20I मधील वेगवान शतक

टी 20I क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विश्व विक्रम हा साहिल चौहान याच्या नावावर आहे. साहिलने अवघ्या 27 चेंडूत 17 जून 2024 रोजी हा कारनामा केला होता. तर टीम इंडियाकडून रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध इंदूर येथे 35 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. तर सूर्याने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्धच 45 बॉलमध्ये शेकडा पूर्ण केला होता.

संजूचा शतकी झंझावात

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.

कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल.
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ.
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्..
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्...
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट.
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्...
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्....