AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK Captain : संजू सॅमसन होणार सीएसकेचा कर्णधार? आर. अश्विनचा मोठा खुलासा

R Ashwin talk on Sanju Samson Captain CSK : चेन्नई सुपर किंग्ज संघाने राजस्थानचा कर्णधार असलेल्या संजू सॅमसन याला कॅप्टन्सीसाठी ऑफर केल्याचा दावा केला होता. महत्त्वाचं म्हणजे याबाबत अश्विनच्या नावाचा वापर करत त्यांनी हा दावा केला. मात्र यावर स्वत: अश्विनने खुलासा केला आहे.

CSK Captain : संजू सॅमसन होणार सीएसकेचा कर्णधार? आर. अश्विनचा मोठा खुलासा
| Updated on: Nov 30, 2023 | 4:21 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 आधी मोठ्या उलथापालथी होत असल्याचं दिसत आहे. गुजरात संघाचा कर्णधार मुंबई इंडियन्स संघाने ट्रेड केला. हार्दिकसाठी मुंबई संघाने तब्बल 15 कोटी रूपये मोजले, त्यासोबतच संघातील ऑल राऊंडर खेळाडू असलेल्या कॅमरून ग्रीनला त्यांनी आरसीबीला दिलं. अशातच सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने राजस्थानचा कर्णधार असलेल्या संजू सॅमसन याला कॅप्टन्सीसाठी ऑफर केल्याचा दावा केला जात होता. महत्त्वाचं म्हणजे याबाबत अश्विनच्या नावाचा वापर करत त्यांनी हा दावा केलेला. मात्र यावर स्वत: अश्विनने खुलासा केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

एका एक्स युजरने, सोशल मीडियावर रवी अश्विनने आपल्या यू ट्यूब चॅनेलवर संजू सॅमसन याला सीएसकेच्या कर्णधारपदासाठी विचारलं होतं. मात्र संजूने त्यासाठी नकार दिला असला तरी भविष्यात तो सीएसकेकडे जाण्याची दाट शक्यता असल्याचं सांगितलं. हार्दिक पंड्यानंतर आणखी एक कर्णधार आता ट्रेड होणार अशा चर्चा सोशल माध्यमांवर होत आहेत. या चर्चा जोर धरू लागल्यावर अश्विनने यावर खुलासा केला आहे.

आर. अश्विन याने ट्विट केलं असून, उगाच माझ्या नावाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवू नका, असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर ट्विट जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. आर. अश्विन आता राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असल्याने त्याच्या नावाने व्हायरल झालेलं वक्तव्य हे चाहत्यांना खरं वाटू लागलं होतं. मात्र यावर अश्विनने स्वत: खुलासा करत या चर्चांणा पूर्णविराम दिला आहे.

आऱ. अश्विन याचं ट्विट-

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून संजू सॅमसन याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नसल्याने चाहते निवड समितीवर नाराज आहेत. संजूसारख्या गुणवान खेळाडूला संघात जागा न दिल्याने अनेकदा बीसीसीआयवर काही माजी खेळाडूंनीही निशाणा साधला आहे. संजू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.