SCO vs AUS : ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय, दुसऱ्या सामन्यात स्कॉटलँडवर 70 धावांनी मात
Scotland vs Australia 2nd T20I Match Result: ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. यासह स्कॉटलँड विरुद्धची मालिकाही जिंकली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने स्कॉटलँडवर दुसऱ्या टी 20I सामन्यात 70 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र स्कॉलँडचा डाव 126 धावांवर आटोपला. स्कॉटलँडला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडला 16.4 ओव्हरमध्येच गुंडाळलं. स्कॉटलँडकडून ब्रँडन मॅकमुलेन याने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर इतर एकालाही ब्रँडन मॅकमुलेनला साथ देता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोयनिस याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
स्कॉटलँडकडून ब्रँडन व्यतिरिक्त एकालाच दुहेरी आकडा गाठता आला. जॉर्ज मुन्से याने 19 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना काहीच करता आलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्टोयनिस व्यतिरिक्त कॅमरुन ग्रीन याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर झेवियर बार्टलेट,सीन एबोट, एडम झॅम्पा आणि आरोन हार्डी या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी स्कॉटलँडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी जॉस इंग्लिस याने 103 धावांची शतकी खेळी केली. ऑलराउंडर कॅमरुन ग्रीनने 36 धावांचं योगदान दिलं.ओपनर जेक फ्रेझर-मॅकगर्क याने 16 धावा जोडल्या. ट्रॅव्हिस हेडल याला भोपळाही फोडता आला नाही. तर मार्कस स्टोयनिस आणि टीम डेव्हिड या जोडीने अनुक्रमे नाबाद 20 आणि 17 धावांचं योगदान दिलं. ब्रॅडली करी याने स्कॉटलँडकडून 3 विकेट्स घेतल्या. तर क्रिस्टोफर सोलच्या खात्यात 1 विकेट गेली.
ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय
Australia ensure series win with another comprehensive display 👌#SCOvAUS 📝: https://t.co/iMdP12iutX pic.twitter.com/ZaMv9bqVQs
— ICC (@ICC) September 6, 2024
स्कॉटलँड प्लेइंग ईलेव्हन : रिची बेरिंग्टन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, चार्ली टीयर (विकेटकीपर), मायकेल लीस्क, मार्क वॅट, ख्रिस ग्रीव्हज, क्रिस्टोफर सोल, ब्रॅड व्हील आणि ब्रॅडली करी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), आरोन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट आणि ॲडम झाम्पा.