IND vs SA: Virat Kohli साठी कायपण! ‘त्या’ चाहत्याची उधळपट्टी, फक्त सेल्फीसाठी मोजले तब्बल इतके हजार
IND vs SA: एका सेल्फीसाठी इतका खर्च कसा येऊ शकतो? त्याचं झालं असं की....
मुंबई: भारतात क्रिकेटर्सना (Indian cricketers) देवाचा दर्जा आहे. चाहते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. क्रिकेटपटूंवरील चाहत्यांच्या प्रेमाला मर्यादा नसते. विराट कोहली (Virat Kohli) भारतातील लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर (Social Media) विराटची सर्वात मोठी फॅन फॉलोइंग आहे. विराट कोहलीसाठी चाहते अनेकदा काहीही करायला तयार असतात.
काहीही करुन विराट कोहलीला भेटायचचं होतं
आसाममधील अशाच एक चाहत्याने विराट कोहलीसोबत सेल्फी काढण्यासाठी चक्क 23 हजार रुपये खर्च केले. राहुल राय हा गुवाहाटीच्या शांतीपूर येथे राहतो. त्याला काहीही करुन विराट कोहलीला भेटायचचं होतं.
त्याने रुम बुक केला
त्याने गुवाहाटी एयरपोर्टवर सुरक्षा रक्षकांचं कड भेदून विराट कोहली सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्याला यश मिळालं नाही. त्यानंतर त्याने टीम इंडिया गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे रुम बुक केला. त्यासाठी त्याने तब्बल 23,400 रुपये खर्च केले.
टी 20 सीरीजमधला दुसरा सामना होणार
अखेर दुसऱ्यादिवशी ब्रेकफास्ट लाऊंजमध्ये त्याला विराट सोबत सेल्फी काढण्याची संधी मिळाली. तिथे त्याने विराटची भेट घेतली. आज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सीरीजमधला दुसरा सामना होणार आहे.
29 सप्टेंबरला टीम इंडिया गुवाहाटी एयरपोर्टवर उतरली. त्यावेळी राहुलने विराटसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. राहुलने सुरक्षाकडंभेदून विराट जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला संधी मिळाली नाही.
फक्त विराटसाठी सर्व काही
त्यानंतर राहुलने टीम इंडिया उतरलेल्या हॉटेलमध्ये रुम बुक केली. इथे रुम बुक करणं इतक स्वस्त नव्हतं. टीम इंडिया फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबली आहे. तिथे दिवसाच भाडं 23,400 रुपये आहे. राहुल रायने फक्त विराटसोबत सेल्फी काढण्यासाठी इतकी रक्कम मॅनेज केली.