Wimbledon 2022: नोव्हाक जोकोव्हिचचा जबरदस्त खेळ, सलग चौथ्यांदा विम्बल्डनच्या फायनल मध्ये प्रवेश

Wimbledon 2022: टॉप सीडेड नोव्हाक जोकोव्हिचने (Novak Djokovic) आठव्यांदा विम्बल्डन (Wimbledon) टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Wimbledon 2022: नोव्हाक जोकोव्हिचचा जबरदस्त खेळ, सलग चौथ्यांदा विम्बल्डनच्या फायनल मध्ये प्रवेश
नोव्हाक जोकोविचImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 7:45 AM

मुंबई: टॉप सीडेड नोव्हाक जोकोव्हिचने (Novak Djokovic) आठव्यांदा विम्बल्डन (Wimbledon) टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्याने 9 व्या सीडेड ब्रिटनच्या कॅमेरून नॉरीवर (Cameron Norrie) 2-6, 6-3, 6-2 आणि 6-4 असा विजय मिळवला. विम्बल्डनची सेमी फायनल मॅच खेळणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचसाठी सुरुवात चांगली झाली नाही. पहिला सेट त्याने गमावला. पण त्यानंतर जोकोव्हिचने आपल्या खेळात सुधारणा केली. त्याने सलग तीन सेटसह सामना जिंकला. नोव्हाक जोकोव्हिचने सलग चौथ्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची जोकोव्हिचची ही आठवी वेळ आहे. अंतिम फेरीत त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचे आव्हान असेल. नवव्या सीडेज नॉरीने दमदार सुरुवात केली होती. नोव्हाक जोकोव्हिचला तो धक्का देईल, असं वाटत होतं. नॉरीने आक्रमक खेळताना पहिला सेट ६-२ असा जिंकला. त्याने या सेटमध्ये दोन वेळा जोकोव्हिचची सव्‍‌र्हिस भेदली.

नंतर जोकोव्हिचने मागे वळून पाहिलं नाही

पहिल्या सेट मध्ये जोकोव्हिचने केलेल्या चुकांचा नॉरीने फायदा उचलला व पाच गेमसह सेट जिंकला. पण त्यानंतर जोकोव्हिचने आपला खेळ उंचावला. दुसऱ्या सेटच्या आठव्या गेम मध्ये जोकोव्हिचने नॉरीची सर्व्हीस भेदली. त्यानंतर जोकोव्हिचने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. मागे वळून पाहिलं नाही. जोकोव्हिचने त्यानंतर पुढचे तीन सेट 6-3, 6-2 आणि 6-4 असे जिंकले.

21 वी ग्रॅण्ड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकण्याचा इरादा

सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच टेनिस विश्वातील सर्वोत्तम खेळाडू आहे. सेमीफायनलच्या सामन्यातही त्याने त्याच्या लौकीकाला साजेसा खेळ केला. 32 व्यां दा त्याने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. रविवारी 21 वी ग्रॅण्ड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकण्याच्या इराद्याने तो विम्बल्डन कोर्टवर उतरेल.

राफेल नदालची माघार

स्पेनच्या झुंजार राफेल नदालने टेलर फ्रिट्झला नमवून विम्बल्डनच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. पण दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. त्यामुळे सेमी फायनल न खेळताच ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश झाला. रविवारी टेनिस चाहत्यांना नदाल-जोकोव्हिच सामन्याचा थरार अनुभवता येणार नाही.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.