Shaheen Afridi लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी खवळला, नाराजीच कारण काय?

Shaheen Afridi Wedding : शाहिद आफ्रिदीच्या मुलीसोबत शाहीनचा निकाह झाला. या प्रसंगी पाकिस्तानी संघातील दिग्गज खेळाडू शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सगळ्यांनीच शाहीन आणि अंशाला शुभेच्छा दिल्या. पण निकाहच्या दुसऱ्याच दिवशी शाहीन आफ्रिदी नाराज झाला.

Shaheen Afridi लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी खवळला, नाराजीच कारण काय?
Shaheen Afridi WeddingImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 8:09 AM

Shaheen Afridi Wedding : पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा 3 फेब्रुवारीला निकाह झाला. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीच्या मुलीसोबत शाहीनचा निकाह झाला. या प्रसंगी पाकिस्तानी संघातील दिग्गज खेळाडू शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सगळ्यांनीच शाहीन आणि अंशाला शुभेच्छा दिल्या. पण निकाहच्या दुसऱ्याच दिवशी शाहीन आफ्रिदी नाराज झाला. सोशल मीडियावर त्याने आपल्या मनातील नाराजी सुद्धा बोलून दाखवली. लोकांनी आपल्या प्रायव्हसी सम्मान केला नाही. त्यामुळे आपल्याला प्रचंड दु:ख झालय, असं शाहीनने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हे खूपच निराशाजनक

शाहीन आफ्रिदीने एका टि्वट केलं. “हे खूपच निराशाजनक आहे. वारंवार आवाहन करुनही लोकांनी आमच्या खासगी जीवनाचा मान ठेवला नाही. लोकांना त्यांचा गुन्हा माहित आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना नम्रतापूर्वक सांगेन की, आम्हाला सहकार्य करा. आमच्यासाठी संस्मरणीय असलेल्या मोठ्या दिवसाचा आनंद खराब करु नये” असं त्याने टि्वटमध्ये म्हटलं होतं.

शाहीनच्या चिडण्यामागे कारण काय?

शाहीन आफ्रिदीची पत्नी अंशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुले शाहीन आफ्रिदी चिडला. आता हा फोटो कोणी लीक केला? हा प्रश्न आहे. फोटो लीक करणारा शाहीन शाह आफ्रिदीचा पाहुणाच आहे. शाहीनने लग्नसाठी ज्या लोकांना निमंत्रित केलं होतं, त्यांच्यापैकीच कोणीतरी फोटो लीक केलाय. फॅन्सनी शाहीदला हीच गोष्ट सांगितली. शाहीनने स्वत: शेअर केला लग्नाचा फोटो

शाहीनने स्वत: आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला. पण त्यात पत्नी अंशाचा चेहरा झाकलेला आहे. शाहीनने सोशल मीडियावर निकाहचा फोटो शेअर करताना लिहिलं की, “ईश्वर दयाळू आहे. शुभेच्छांसाठी आणि आमचा खास दिवस आणखी विशेष बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार”

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.