Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaheen Afridi Wedding : निकाह आज होणार पण पत्नी सोबत राहणार नाही? शाहीन आफ्रिदीच्या लग्नाआधी मोठी बातमी

Shaheen Afridi Wedding : शाहीनचा आज निकाह होणार आहे. तो शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानी क्रिकेटमध्ये 'लाला' म्हटलं जातं.

Shaheen Afridi Wedding : निकाह आज होणार पण पत्नी सोबत राहणार नाही? शाहीन आफ्रिदीच्या लग्नाआधी मोठी बातमी
shaheen shah afridiImage Credit source: shaheen shah afridi instagram
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 1:11 PM

Shaheen Afridi Marriage : पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसाठी आजचा दिवस 3 फेब्रुवारी खूप खास आहे. शाहीनचा आज निकाह होणार आहे. तो शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानी क्रिकेटमध्ये ‘लाला’ म्हटलं जातं. शाहीनचा शुक्रवारी शाहिदची मुलगी अंशासोबत निकाह होणार आहे. दोन वर्षांपूर्वी शाहिद आफ्रिदीने त्याची मुलगी आणि शाहीन आफ्रिदीच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली होती. मुलीच्या शिक्षणामुळे शाहीद आफ्रिदीने लग्नासाठी दोन वर्ष वाट पाहिली. आता शाहीनची प्रतिक्षा संपली आहे.

निकाहानंतर एकत्र राहणार नाही?

शाहीन आणि अंशाचा निकाह आज 3 फेब्रुवारीला रात्री कराचीमध्ये होणार आहे. शाहीनला निकाहानंतरही आपल्या पत्नीपासून लांब रहाव लागणार आहे. शाहीन आणि अंशा आज निकाह नाम्यावर स्वाक्षरी करतील. पण शाहिद आज मुलीची पाठवणी करणार नाही, असं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलय. पाठवणीशिवाय शाहीन आणि अंशा एकत्र राहू शकत नाही.

अंशाशी निकाह करणं माझ स्वप्न

अंशाशी निकाह करणं माझ स्वप्न होतं, अस शाहीन शाह आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी मुलाखतीत सांगितलं होतं. मनातील इच्छा पूर्ण होत असल्यामुळे मी खूप आनंदी असल्याच शाहीनने सांगितलं. साखरपुड्यानंतर तो या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता.

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये कोणी-कोणी लग्न केलय?

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. शाहीनच्या आधी वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ, बॅट्समन शान मसूद आणि ऑलराऊंडर शादाब खानने निकाह केला. शाहीन शाह आफ्रिदी शाहीद आफ्रिदीच्या मुलीबरोबर लग्न करणारी ही चर्चा मागच्या दोन वर्षांपासून आहे. दुखापतीमुळे पाकिस्तानी टीममध्ये नाहीय

शाहिन आफ्रिदी सध्या दुखापतीमुळे पाकिस्तानी टीममध्ये नाहीय. त्याला आधी श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो आशिया कपमध्ये खेळू शकला नाही. टी 20 वर्ल्ड कप पर्यंत तो फिट झाला. पण फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना शाहीन शाह आफ्रिदीला पुन्हा दुखापत झाली.

'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.