T20 World Cup 2021: एखादा चमत्कारच भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो, शाहीद आफ्रिदीची कोपरखळी
विश्वचषकात सलगच्या दुसऱ्या पराभवानंतर सर्वच स्तरातून भारतीय क्रिकेट संघावर टीका होत आहेत. यातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीदही मागे राहिलेला नाही.
मुंबई : अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी भरलेला भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात मैदानावर मात्र पूरता अपयशी ठरतोय. भारतीय संघासाठी यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) अतिशय निराशाजनक सुरु आहे.पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळालं आहे. ज्यामुळे सर्वचजण भारतीय संघावर टीका करत असून पाकिस्तानचे माजी खेळाडू कुठे मागे राहणार आहेत.
पाकचा माजी ऑलराऊंडर शाहीद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारतीय संघाला मजेशीर पद्धतीने हिणवताना, ‘भारताचं पुढील फेरीत पोहोचणं एक चमत्कारच असेल’. असं म्हटलं आहे. शाहीदने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्याने भारत सेमीफायनलमध्ये पोहचण्याची आशा अजूनही कायम आहे, पण त्यांनी मोठे दोन सामने गमावल्यामुळे आता त्यांच पुढे पोहोचणं म्हणजे एक चमत्कारच असू शकतो., असं लिहिलं आहे.
India still have an outside chance of qualifying for semis but with how they have played their two big games in the event, it will be nothing but a miracle to see them qualify. @T20WorldCup
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) October 31, 2021
असा जाऊ शकतो भारत सेमीफायनलमध्ये
भारताने सलग दोन मॅच गमावल्यामुळे गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचं पोहोचणं अवघड झालं असलं तरी क्रिकेट हा एक खेळ असल्याने यामध्ये काहीही होऊ शकतं. भारताचे पुढील सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघाविरुद्ध आहेत. या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट-रनरेट खूप वाढवावा लागेल. किमान 100 धावांच्या फरकाने सामने जिंकणे भारताला गरजेचे आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ स्कॉटलंड आणि नामीबिया संघाविरुद्ध अगदी छोट्या फरकाने पराभूत होणं गरजेचं आहे. तसचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागणं गरजेचं आहे. हे सार फार अवघड असलं तरी हा खेळ असल्याने काहीही होऊ शकतं हे नक्की.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?
(Shahid Afridi says it will be miracle if team india will reach to semi final in t20 world cup)