Retirement | दारू पार्ट्यांमुळे बंदी, अखेर स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा, बायको आहे न्यूज अँकर
एक असा स्टार खेळाडू ज्याच्यावर त्याच्या वाईट सवयींमुळे क्रिकेट बोर्डाने बॅन लावला होता. करियरमध्ये क्रिकेटसह या गोष्टींमुळेही तो जास्त चर्चेत राहिला होता. या खेळाडूची पत्नी प्रसिद्ध पत्रकार आहे.
मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यंदा वर्षाच्या सुरूवातीला क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या बातम्या येत आहेत. यामधील काहींना आधीच निवृत्तीबद्दल जाहीरपणे सांगितलं होतं. तर काहींना अचानक तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. अशातच एका स्टार खेळाडूनेही निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाविरूद्ध या खेळाडूने शेवटचा सामना खेळला होता. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
खेळाडूची निवृत्तीची घोषणा
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने यंदा कसोटी आणि वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर यशस्वी कॅप्टनपैकी एक असलेल्या अॅरॉन फिंच यानेही बिग बॅश लीगमधून निवृत्ती घेतली आहे. अशातच आणखी एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली तो दुसरा तिसरा कोणी नसून शॉन मार्श आहे.
Shaun Marsh has announced his retirement from professional cricket.
– The first superstar of the IPL…!!! pic.twitter.com/GYK5OJmwbE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 14, 2024
शॉन मार्श हा कायम चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. आपल्या बेशिस्तपणामुळे त्याच्यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर दोन सामन्यांचा बॅन घातला होता. तर चॅम्पियन ट्रॉफीमधूनही त्याला याच कारणामुळे वगळण्यात आला होता. त्यावेळी शॉनचा भाऊ मिशेल मार्श याच्या 21 व्या वाढदिवसाला त्याने दारू प्यायली होती. त्यावेळी तो चांगलाच चर्चेत आला होता. मार्श याची पत्नी रेबेका मार्श चॅनल 7 मध्ये न्यूज अँकर आहे.
दरम्यान, 11 वर्षांच्या करियरमध्ये एकूण 38 कसोटी, 73 एकदिवसीय आणि 15 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये अनुक्रमे 2265 धावा, 2773 धावा आणि 255 धावा केल्या आहेत. यामधील कसोटीमध्ये सहा तर एकदिवसीय सामन्यांमध्ये सात शतके ठोकली आहेत.