IPL 2022, DC vs PBKS, Orange Cap : पृथ्वी शॉ दोनशे पार, बटलर अजूनही ऑरेंज कॅपमध्ये अव्वल, पाहा ऑरेंज कॅपच्या यादीतील बदल

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला सहज हरवलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी पंजाब किंग्सला 115 धावांवर रोखलं. यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत काय बदल झालाय पाहुया.

IPL 2022, DC vs PBKS, Orange Cap : पृथ्वी शॉ दोनशे पार, बटलर अजूनही ऑरेंज कॅपमध्ये अव्वल, पाहा ऑरेंज कॅपच्या यादीतील बदल
ऑरेंज कॅपवर जॉस बटलरची पकड कायमImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 7:14 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये काल दिल्ली कॅपिटल्सने (DC) पंजाब किंग्सला (PBKS) सहज हरवलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी पंजाब किंग्सला 115 धावांवर रोखलं. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरने जबरदस्त सुरुवात करुन दिली. त्यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने नऊ विकेट राखून हा सामना जिंकला. वॉर्नर (David Warner) आणि शॉ ने वेगाने धावा जमवल्या. त्यामुळे 11 षटकातच दिल्लीने विजयी लक्ष्य गाठलं. दिल्लीने फक्त दोन पॉइंटच मिळवले नाहीत, तर त्यांच्या नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. सहा सामन्यात त्यांचा हा तिसरा विजय आहे. पंजाबचा सात सामन्यातील चौथा पराभव आहे. दिल्लीकडून डेविड वॉर्नरने नाबाद 60, पृथ्वी शॉ ने 41 आणि सर्फराझ खानने नाबाद 12 धावा केल्या. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत बदल झालाय.

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जोस बटलर आहे. त्याने 375 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. राहुलने 265 धावा काढल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फाफ डु प्लेसिस आहे. त्याने 250 धावा काढल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. त्याने 236 धावा काढल्या आहे.  त्यानंतर हार्दिक पंड्या ऑरेंज कॅपच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 228 धावा काढल्या आहेत. तर पृथ्वी शॉ हा नवव्या क्रमांकावर असून तो देखील जोरदार फटकेबाजी करतोय.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

पंजाबचं नेमकं काय झालं?

पहिली तीन षटक पंजाबने चांगली फलंदाजी केली. पण सलामीवीर शिखर धवन बाद झाला. त्यानंतर पंजाब किंग्सच्या डावाची सुरु झालेली घसरण. शेवटपर्यंत थांबली नाही. ललित यादवच्या फिरकी गोलंदाजीवर फटका खेळताना शिखर धवन बाद झाला. ऋषभ पंतने यष्टीपाठी जबरदस्त झेल घेतला. खरंतर ललितने टाकलेला चेंडू एवढा खास नव्हता. पण शिखर चुकीचा फटका खेळला. त्यानंतर कॅप्टन मयंक अग्रवाल पाठोपाठ तंबूत परतला. लियाम लिव्हिंगस्टोनकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण काल तो स्वस्तात बाद झाला. या सीजनमध्ये लिव्हिंगस्टोन जबरदस्त फलंदाजी करत आहे.

इतर बातम्या

Scholarship : येत्या शैक्षणिक वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना डिबीटी प्रणालीद्वारे मिळणार शालांतपूर्व शिष्यवृत्ती

Zodiac | 3 राशींना मिळणार बक्कळ पैसा, शुक्र आणि गुरू उघडणार भाग्य दार!

GOOGLE PAY CREDIT CARD: आता स्वॅप करा गूगल पे क्रेडिट कार्ड, अप्लाय करा अन् शॉपिंगचा आनंद लुटा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.