AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shefali Verma: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शेफाली वर्मा इमोशनल, नाही रोखता आले अश्रू

Indian Cricket Team: भारताच्या महिला टीमने इंग्लंडला 7 विकेटने हरवून अंडर 19 वर्ल्ड कपच जेतेपद पटकावल आहे. मॅचनंतर कॅप्टन शेफाली वर्मा इमोशनल झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Shefali Verma: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शेफाली वर्मा इमोशनल, नाही रोखता आले अश्रू
Shefali vermaImage Credit source: Twitter
| Updated on: Jan 30, 2023 | 10:00 AM
Share

India vs England Women Under-19 World Cup : भारताच्या महिला टीमने इंग्लंडला 7 विकेटने हरवून अंडर 19 वर्ल्ड कपच जेतेपद पटकावल आहे. ट्रॉफी जिंकून शेफाली वर्माने देशवासियांना खूप सुंदर गिफ्ट दिलय. भारतीय प्लेयर्सनी शानदार खेळ दाखवला. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची टीम ढेपाळली. मॅच संपल्यानंतर शेफाली वर्मा भावनिक झाली होती. तिने मोठं विधान केलय. “ज्याप्रमाणे सगळ्या मुलींनी चांगलं प्रदर्शन करुन एक-दुसऱ्याच समर्थन केलं, ते खरोखरच आनंददायी आहे. आम्ही इथे कप जिंकण्यासाठी आलो होतो” समर्थन करणाऱ्या सर्वांचे शेफाली वर्माने आभार मानले. हे सर्व बोलत असताना शेफाली खूपच भावूक झाली होती.

या प्लेयरच केलं कौतुक

“मला इतकी चांगली टीम दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार. कप जिंकल्यामुळे मी आनंदात आहे. टुर्नामेंटमध्ये श्वेता सेहरावतने दमदार खेळ दाखवला. फक्त तिनेच नाही, अर्चना, सौम्या आणि बाकी खेळाडूंच प्रदर्शन सुद्धा अविश्वसनीय होतं” असं शेफाली म्हणाली.

शेफाली इथेच थांबणार नाही

आयसीसीकडून पहिल्यांदाच महिला अंडर 19 वर्ल्ड कपच आयोजन करण्यात आलं होतं. टीम इंडियाने आयसीसीने या वयोगटासाठी पहिल्यांदाच आयोजित केलेला वर्ल्ड जिंकला तसच भारतीय महिला क्रिकेटमधील हा पहिला वर्ल्ड कप आहे. शेफाली एवढ्यावरच थांबणार नाहीय. अंडर 19 वर्ल्ड कप तुझ्यासाठी एकमेव मोठी ट्रॉफी आहे का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर तिने दक्षिण आफ्रिकेत 10 ते 26 फेब्रवारी दरम्यान आगामी महिला टी 20 वर्ल्ड कपकडे इशारा केला.

बऱ्याच काळापासून या क्षणाची प्रतिक्षा

“बऱ्याच काळापासून या क्षणाची प्रतिक्षा करत होते. आमच्या डोक्यात एक योजना होती. सुदैवाने जी योजना बनवलेली त्यावर अमलबजावणी केली. स्पिनर्सनी चांगली कामगिरी केली” असं शेफाली म्हणाली. तीन वर्षापूर्वीची सल भरुन निघाली

तीन वर्षांपूर्वी वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. शेफाली वर्मा त्या टीमचा भाग होती. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात 2020 महिला टी 20 वर्ल्ड कपचा फायनल सामना झाला. ऑस्ट्रेलियाने 185 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 99 धावात आटोपला होता. आता 2023 मध्ये पोचेफस्ट्रूम येथे वर्ल्ड कप विजयाने मनात असलेली ती सल भरुन निघाली. या प्रसंगी शेफाली वर्माच्या डोळ्यात आनंदश्रू तरळले. भारतीय महिला क्रिकेटने वास्तवात एक मोठा टप्पा गाठलाय.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.