Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या बॉलरला 5 बॉलमध्ये मारले 6,6,6,6,6, RCB ने काढून टाकलेल्या खेळाडूने दाखवली ताकत

युवराज सिंहने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला 6 बॉलमध्ये मारलेले 6 सिक्स प्रत्येकाच्या स्मरणात आहेत. 2007 T20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंहने हा कारनामा केला होता. सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये T20 इंटरनॅशनल लीग सुरु आहे.

टीम इंडियाच्या बॉलरला 5 बॉलमध्ये मारले 6,6,6,6,6, RCB ने काढून टाकलेल्या खेळाडूने दाखवली ताकत
sherfane rutherfordImage Credit source: Desert Vipers Twitte
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 7:49 AM

दुबई – T20 क्रिकेटमध्ये बॉलरपेक्षा बॅट्समनची दहशत जास्त असते. क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये फोर-सिक्ससह धावांचा पाऊस पहायला मिळतो. युवराज सिंहने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला 6 बॉलमध्ये मारलेले 6 सिक्स प्रत्येकाच्या स्मरणात आहेत. 2007 T20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंहने हा कारनामा केला होता. सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये T20 इंटरनॅशनल लीग सुरु आहे. इथे युवराजची बरोबरी करण्यासाठी एका बॅट्समनला फक्त एक सिक्स कमी पडला. या T20 लीगमध्ये गुरुवारी सामना झाला. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या शेरफेन रदरफोर्डने एका ओव्हरमध्ये पाच चेंडूंवर सलग पाच सिक्स मारले.

कुठल्या टीममध्ये सुरु होती मॅच?

रदरफोर्ड या लीगमध्ये डेजर्ट वायपर्सकडून खेळत होता. वायपर्स आणि दुबई कॅपिटल्सच्या टीममध्ये सामना सुरु होता. या मॅचमध्ये वायपर्सच्या टीमने पहिली बॅटिंग केली. रदरफोर्डने या मॅचमध्ये 50 धावा केल्या. त्याने त्याच्या तुफानी इनिंगमध्ये 23 चेंडूत 6 सिक्स मारले.

कुठल्या भारतीय बॉलरची धुलाई?

शेरफेन रदरफोर्डने 16 व्या ओव्हरमध्ये हे 5 सिक्स मारले. टीम इंडियाकडून खेळलेला युसूफ पठान गोलंदाजी करत होता. रदरफोर्डने या ओव्हरच्या 2 दुसऱ्या चेंडूपासून अखेरच्या बॉलपर्यंत गगनभेदी सिक्स मारले. रदरफोर्डने पठानच्या डोक्यावरुन पहिला सिक्स मारला. त्यानंतर लाँग ऑनला पुढचा सिक्स मारला. हा सिक्स 93 मीटर लांब गेला. पाचव्या चेंडूवर पुल करुन लेग साइडला सिक्स मारला. शेवटच्या बॉलवर स्वीप मारुन लेग साइडला सिक्स मारला. रदरफोर्ड ओव्हरचा पहिला चेंडू खेळला नव्हता. अन्यथा सहा बॉलमध्ये सहा सिक्सच्या रेकॉर्डची नोंद झाली असती.

RCB ला हा निर्णय महाग पडणार?

युसूफ पठानच्या या ओव्हरमध्ये वायपर्सने 31 धावा वसूल केल्या. पाच सिक्सच्या मदतीने रदरफोर्ड 20 चेंडूत 46 धावांवर पोहोचला. त्यानंतर त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. रदरफोर्ड आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळला होता. पण पुढच्या सीजनसाठी टीमने त्याला रिटेन केलं नाही. युसूफ पठानने या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 48 धावा देऊ एक विकेट काढला. बिलिंग्सच पण अर्धशतक

या मॅचमध्ये फक्त रदरफोर्डचीच बॅट चालली नाही, तर इंग्लंडचा युवा बॅट्समन सॅम बिलिंग्सने सुद्धा धावा केल्या. बिलिंग्सने 48 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने 54 धावा केल्या. सलामीवीर रोहन मुस्तफाने 21 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.