सचिनसाठी शोएब अख्तरने अल्लाहकडे मागितली दुवा, म्हणाला…

क्रिकेटच्या मैदानावर कायम सचिन विरुद्ध शोएब अख्तर अशी जुगलबंदी रंगायची. कधी सचिन शोएबवर वरचढ ठरायचा तर कधी शोएब सचिनची दांडी गुल करायचा. मात्र त्यांच्या मैत्रीची दांडी एकमेकांनीही कधीच गुल होऊ दिली नाही. | Shoaib Akhtar On Sachin tendulkar

सचिनसाठी शोएब अख्तरने अल्लाहकडे मागितली दुवा, म्हणाला...
Shoaib Akhtar And Sachin Tendulkar
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 8:46 AM

मुंबई : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar Corona) कोरोनाची लागण झाल्यानंतर तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी जगभरातून त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करतायत. तसंच क्रिकेट विश्वातूनही सचिन लवकरच बरा व्हावा, अशी मनोकामना व्यक्त करण्यात येतीय. पाकिस्तानचा महान खेळाडू रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) देखील सचिनसाठी अल्लाहकडे दुवा मागितली आहे. सचिनला लवकरच आराम मिळू दे आणि त्याने कोरोनावर मात करु दे, अशी प्रार्थना शोएबने केली आहे. (Shoaib Akhtar Wish Sachin tendulkar recovery After Sachin tested Covid positive)

सचिनसाठी अल्लाहकडे शोएबची दुवा

सचिनला कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक खेळाडूंनी ट्विट करत त्याच्या तब्येतीविषयी विचारपूस केली तसंत त्याने कोरोनावर लवकरच मात करावी, अशा शुभेच्छा दिल्या. अशातच शोएब अख्तरनेही सचिनसाठी अल्लाहकडे दुवा मागतिली आहे. शोएबने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सचिनसोबचा एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये त्याने लिहिलंय, “क्रिकेटच्या मैदानावर माझ्या फेवरेट प्रतिस्पर्ध्यापैकी एक असलेल्या सचिनला लवकरच आराम मिळू दे, त्याने लवकरच कोरोनावर मात करावी”.

सचिन शोएबची मैत्री

क्रिकेटच्या मैदानावर कायम सचिन विरुद्ध शोएब अख्तर अशी जुगलबंदी रंगायची. कधी सचिन शोएबवर वरचढ ठरायचा तर कधी शोएब सचिनची दांडी गुल करायचा. मात्र त्यांच्या मैत्रीची दांडी एकमेकांनीही कधीच गुल होऊ दिली नाही. सचिन शोएबची खूप चांगली मैत्री आहे. दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना ज्यावेळीही भारत पाकिस्तान सामने असायचे त्यावेळी एकत्र जेवण, गप्पांचा फड अशा कितीतरी आठवणी दोघेही वेळेप्रसंगी सांगत असतात.

Sachin Tendulkar Corona : सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

निखळ मैत्री पण क्रिकेटच्या मैदानावर दोघेही रणझुंझार

दुसरीकडे मैत्रीचं घट्ट नातं असलं तरी क्रिकेटच्या मैदानावर मात्र दोघेही रणझुंझारपणे एकमेकांच्या विरोधात खेळायचे. मग कधी सामना बॅट आणि बॉलने व्हायचा तर कधी तोंडाने… स्लेजिंग हा भारत आणि पाकिस्तान मॅचमधला ठरलेला विषय. अनेकवेळा शोएबने सचिनला डिवचलं. मात्र सचिनने नेहमीच त्याला आपल्या बॅटने उत्तर दिलं.

सचिनला कोरोनाची लागण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झालीय. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

(Shoaib Akhtar Wish Sachin tendulkar recovery After Sachin tested Covid positive)

हे ही वाचा :

IPL 2021 : “माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण”

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या, हे स्टार खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत!

IPL 2021 : रिषभ पंतच्या पाठीवर रिकी पॉटिंगचा हात, समर्थनार्थ ‘खास बात!’

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.